शिक्षकेतर पदांसाठी होणार परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे २३ शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. ही सरळ सेवा भरती असल्याने मुलाखतीतून निवड केली जाणार होती. मात्र, पाच लिपिक पदांसाठी एक हजारावर अर्ज आलेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेणे शक्‍य नसल्याने त्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. अर्ज कमी असलेल्या वर्ग एक आणि दोनच्या पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

विद्यापीठात अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पदभरतीचा ‘बॅकलॉग’ आहे. यामध्ये विभागातील संचालक, सहायक संचालक, प्रकाशन अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विद्यापीठ अभियंता, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी, तांत्रिकी सहायक व इतर तांत्रिक पदे रिक्त आहेत. विद्यापीठात १६ उपकुलसचिवांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७ पदे रिक्त आहेत. तर २८ सहायक कुलसचिवांपैकी १८ जागा रिक्त आहेत. 

याशिवाय अधीक्षक, लिपिक, शिपाई व तांत्रिक प्रवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. याशिवाय शासनाने सेवानिवृत्तीची मर्यादा ६२ वरून ६० केल्याने विभागातील बरीच प्राध्यापक आणि कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. त्यामुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली. 

याचा प्रशासकीय कामावरही ताण वाढतो आहे. शेवटी यंदा शासनाने पदभरतीला मान्यता देत २३ पदांना मंजुरी दिली. त्यानंतर होऊ घातलेल्या या पदभरतीमध्ये हजारो अर्ज आले आहेत. त्यामुळे या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामध्ये गुणांकनाच्या आधारावर विद्यार्थ्यांची छाननी करून निवडक उमेदवारांनाच मुलाखतीला बोलविण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पुढील दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पार पडेल, असा विश्‍वास कुलगुरूंनी व्यक्त केला.

Web Title: nagpur news nagpur university

टॅग्स