निम्म्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 105 वा दीक्षान्त समारंभ 24 मार्चला असल्याने जवळपास 130 परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले. या सर्वच परीक्षा 8 एप्रिलला घेण्याचे परिपत्रक विद्यापीठाने काढले. या दिवशी सीबीएसईची आयआयटी आणि एनआयटीसह अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी "जेईई मेन' आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात येणार आहे. वेळापत्रकात बदल करण्यात आलेल्या 130 परीक्षांच्या पेपरपैकी निम्म्या विषयांचे पेपर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात घेण्याचा विचार विद्यापीठ करीत असल्याची माहिती आहे. 

विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना 1 मार्चपासून सुरुवात झाली. यानुसार पदविका आणि प्रमाणपत्र परीक्षांचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला. चार टप्प्यात होणाऱ्या परीक्षेचा दुसरा टप्पा 24 मार्चपासून सुरू होणार होता. या टप्प्यात बी.ए., बी.कॉम, बीएससीच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरसह एम.ए., एम.कॉमसारख्या परीक्षांचा समावेश होता. मात्र, 24 मार्चला दीक्षान्त समारंभ असल्याने 130 परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या वेळापत्रकातील बदलानुसार आठ एप्रिलला परीक्षा घेण्याचे ठरले. दोन दिवसांपूर्वीच शहरातील काही महाविद्यालयांनी "जेईई मेन'ची ऑफलाइन परीक्षा आठ एप्रिलला असल्याने या परीक्षेसाठी केंद्र दिले आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन परीक्षा घेता येणे शक्‍य नसल्याने विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या अशी विनंती महाविद्यालयांनी केली आहे. त्यातूनच 8 एप्रिलला होणाऱ्या 130 परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्‍यता निर्माण झाली. त्याला प्रशासनाने दुजोराही दिला. आता या परीक्षा नेमक्‍या कोणत्या तारखेला घ्यायच्या यावर बराच खल सुरू आहे. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही परीक्षा संपत असल्याने त्यानंतर लगेच निम्म्या विषयांचे पेपर घ्यावे असा विचार परीक्षा विभाग करीत आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या मध्यान्हात निम्म्या विषयांच्या परीक्षा घेण्याबद्दल विभाग विचार करीत आहे. 

130 परीक्षांपैकी काही परीक्षा लवकर घेण्याचा मानस विद्यापीठाचा आहे. त्या परीक्षा तीन वा चार तारखेलाच संपणाऱ्या इतर परीक्षानंतर घेण्याची तयारी आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. मात्र, विचार सुरू आहे. 
डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू 

Web Title: nagpur news nagpur university exam table