न्या. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा - पटोले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

नागपूर - सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरोधात बंड पुकरल्याने न्यायालयीन प्रक्रियेत केंद्र सरकार हस्तक्षेप करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आक्षेप घेतलेल्यांमध्ये नागपूरमध्ये मृत पावलेल्या सीबीआयचे विशेष न्यायाधीश लोया यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली. न्यायाधीश लोया यांच्या बेंचसमोर सोहराबुद्दीन प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यांचे नागपूरच्या रविभवन येथे मुक्कामी असताना हृदयविकाराने निधन झाल्याचे सांगण्यात येते. रात्री एकला त्यांना ऑटोने मेडेट्रिना इस्पितळात दाखल केले.

नागपूर - सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरोधात बंड पुकरल्याने न्यायालयीन प्रक्रियेत केंद्र सरकार हस्तक्षेप करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आक्षेप घेतलेल्यांमध्ये नागपूरमध्ये मृत पावलेल्या सीबीआयचे विशेष न्यायाधीश लोया यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली. न्यायाधीश लोया यांच्या बेंचसमोर सोहराबुद्दीन प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यांचे नागपूरच्या रविभवन येथे मुक्कामी असताना हृदयविकाराने निधन झाल्याचे सांगण्यात येते. रात्री एकला त्यांना ऑटोने मेडेट्रिना इस्पितळात दाखल केले.  मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येते. ज्या दिवशी लोया यांचा मृत्यू झाला त्या दिवसाच्या रविभवन येथील नोंदणी वहीत त्यांचा नावाचा उल्लेख नाही. येथे मुक्कामी आलेल्यांची नोंद केली जाते.

लोया कोणी साधारण व्यक्ती नव्हते. ते सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश होते. त्यांना प्रोटोकॉल आहे. लाल दिव्याची गाडीही उपलब्ध करून दिली जाते. असे असताना ऑटोतून त्यांना मेडिट्रिना इस्पितळात नेणे हे पटण्यासारखे नाही. रविभवन परिसरात दिवसा ऑटो मिळणेही अवघड असते. रात्री एकला ऑटो कसा मिळाला, असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यांना मारले असा दावा नाही. मात्र, निष्पक्ष चौकशी करून मृत्यूचे खरे कारण समोर आले पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. यावेळी जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.

हे बंड नव्हे काय?
न्या. लोया यांचा घातपात झाल्याचा आरोप पत्नीने केला होता. त्यांच्या मृत्यूबाबत एकूणच संशयाचे वातावरण असताना  मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडापीठाचे तत्कालीन न्यायधीश भूषण गवई व न्या. एस. बी. शुक्रे यांनी लोया यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे वक्तव्य न्यायालयाबाहेर केले होते. न्यायाधीशांना एखाद्या संवेदनशील आणि न्यायप्रविष्ठ प्रकरणावर बाहेर बोलता येते का, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायाल्याच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेत बोलणे हे बंड असेल, तर न्या. गवई आणि न्या. शुक्रे यांचेही वक्तव्य म्हणजे बंडच म्हणावे काय, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: nagpur news Nana Patole Justice Loya