५० हजारांत नवजात बाळाचा ‘सौदा’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

नागपूर - एका दाम्पत्याने दलालाच्या मदतीने मेडिकलमध्ये प्रसूत झालेल्या महिलेच्या १२ दिवस वय असलेल्या बाळाचा ५० हजार रुपयांत सौदा केला. त्यांनी बळजबरीने पैसे देऊन बाळाला हिसकावून पळ काढला. या प्रकरणी प्रसूत महिलेच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी हर्षा मुंदडा (वय ३३) आणि तिचा पती मनीष सूरजरतन मुंदडा (वय ३७, सेनापती नगर, दिघोरी) यांना अटक केली. तर भारती नावाची दलाल पळून गेली. मुंदडा दाम्पत्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.

मोनिका (बदललेले नाव, वय २६, वाडी) या सात महिन्यांच्या गर्भवती असताना भारती नावाच्या एका महिलेने संपर्क साधला. सुरुवातीला तिने ओळखी वाढवली. बाळाची काळजी घेण्याच्या टिप्स वगैरे दिल्या. त्यानंतर तिने चेकअप करून डिलिव्हरीनंतर बाळ दिल्यास ५० हजार रुपये देण्याची ‘ऑफर’ दिली.

मात्र, मोनिकाने वेळ मारून नेण्यासाठी भारतीला होकार दिला. त्यानंतर तिने घरी आरोपी हर्षा आणि मनीष मुंदडा यांची भेट घालून दिली. त्यांनी बाळाऐवजी ५० हजार रुपये देण्याची बोलणी केली. २० नोव्हेंबरला नऊ महिन्यांची गर्भवती असलेली मोनिका मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली. २२ नोव्हेंबरला मोनिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. २३ नोव्हेंबरला तिला मेडिकलमधून सुटी झाली. ३ डिसेंबरला मोनिकाला हर्षा आणि मनीष तसेच दलाल भारतीने संपर्क साधला. तिला धंतोलीतील महाराष्ट्र बॅंक परिसरात बोलावले. ती बाळासह तेथे आली. चौघांमध्ये बोलणी झाली. मात्र, बोलणी फिस्कटली. मोनिकाने बाळ विकण्यास नकार दिला.

त्यामुळे तिच्यासोबत भारती आणि हर्षाने बाचाबाची करीत तिच्याकडून बळजबरीने बाळ हिसकावून पळ काढला. मात्र बाळाला घेऊन पसार होणाऱ्या तिघांबाबत मोनिकाने पोलिसांना माहिती दिली. धंतोली पोलिसांनी हर्षा आणि मनीष या दोघांना अटक केली तर भारती बाळासह गर्दीचा फायदा घेऊन पळून गेली. पोलिसांनी मोनिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत मनीष आणि हर्षाला अटक केली. आठ डिसेंबरपर्यंत आरोपी दाम्पत्य पोलिस कोठडीत आहेत.

बाळ विकणारी टोळी
आर्थिक परिस्थितीने गरीब असलेल्या गरोदर महिलांना हेरून त्यांच्या बाळांचा सौदा करणारी टोळी सक्रिय असल्याचे या प्रकरणातून उघडकीस आले. या टोळीत महिला डॉक्‍टर्स, नर्स आणि दलालांचा समावेश आहे. निपुत्रिक दाम्पत्य किंवा अवयव काढून विकण्यासाठी बाळांचा वापर केल्या जाण्याची शक्‍यता असून हा कारोबार कोट्यवधीत असल्याची माहिती आहे.

बाळाचा पाच लाखांत सौदा 
दलाल महिला असलेली भारती ही पेशाने डॉक्‍टर आहे. ती मध्यस्थाची भूमिका निभावत असून तिचे लॉ कॉलेज चौकात क्‍लिनिक असल्याची माहिती आहे. मुंदडा दाम्पत्य हे नागपुरातील टोळीचे प्रमुख असून भारती गरीब महिलांना पाच लाख रुपयांत बाळ विकण्यासाठी प्रोत्साहित करते. या प्रकरणात केवळ ५० हजार रुपये हाती देऊन उर्वरित साडेचार लाख रुपये न दिल्यामुळे मोनिकाने पोलिस ठाण्यात तक्रार केल्याची चर्चा आहे.

Web Title: nagpur news new born baby deal in 50000 rupees