सुरेवाणीत नाइट पॅट्रोलिंग सफारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नागपूर - पेंच व्याघ्रप्रकल्पांतील सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्राच्या बफर झोनमध्ये नाइट पॅट्रोलिंग सफारीची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यातील ही दुसरी नाइट सफारी असून यापूर्वी दोन वर्षांपूर्वी गोरेवाडा जंगलात नाइट सफारी सुरू करण्यात आली होती. 

नागपूर - पेंच व्याघ्रप्रकल्पांतील सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्राच्या बफर झोनमध्ये नाइट पॅट्रोलिंग सफारीची सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यातील ही दुसरी नाइट सफारी असून यापूर्वी दोन वर्षांपूर्वी गोरेवाडा जंगलात नाइट सफारी सुरू करण्यात आली होती. 

नागपूरपासून साठ किलोमीटवर असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्रात नाइट पॅट्रोलिंगची सुविधा १५ ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. सुरेवाणी परिसरातील १३८ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ४० किलोमीटर परिसरात नाइट सफारीची व्यवस्था सुरू केली आहे. सायंकाळी ७.३० वाजतापासून ते रात्री १२ वाजतापर्यंत नाइट पॅट्रोलिंग सफारी अनुभवता येणार आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, गवा, सांबर, चितळ, रानडुक्कर, चांदी अस्वल, खवल्या मांजर आदी वन्यप्राणी तसेच विविध प्रकारचे पक्षी आहेत. सफारीला सुरेवाणीपासून सुरुवात होऊन महारकुंड तलाव, वाघझिरा, तसेच मध्य प्रदेशच्या वनसीमेपासून परत सुरेवाणी येथे ही सफारी समाप्त होईल. 

मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन, सहायक वनसंरक्षक शतानिक भागवत, नागलवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी पुढाकार घेतला आहे. सफारीसाठी दरदिवशी केवळ तीन जिप्सी किंवा एसयूव्ही वाहनांनाच परवानगी राहील. पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग mahaecotourism.gov.in यावर करता येणार आहे. 

मचाण पर्यटनांच्या माध्यमातून सूर्यास्तापासून तर सूर्योदयापर्यंत मचाणावर बसून निसर्ग व वन्यप्राण्यांना बघण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत पर्यटकांना उपलब्ध होत आहे. पायी गस्त ही सुविधासुद्धा वनविभागातर्फे सुरू केली आहे. सुरेवाणी येथे जाण्यासाठी नागपूर ते पाटणसावंगी, खापा टी पाइंट, खापा, बडेगाव, महारकुंड ते सुरेवाणी असा साठ किलोमीटरचा प्रवास आहे.

Web Title: nagpur news Night Patrolling Safari