महाराष्ट्राला फडणवीसांची जास्त गरज - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहेत. केंद्रातही काम करण्याची त्यांच्याकडे योग्यता आहे; मात्र राज्यातील आव्हाने आणि समस्या बघता महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची जास्त आवश्‍यकता आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले. 

गडकरी यांच्या वाड्यावर आज श्रीगणेशाची स्थापना झाली. या वेळी पत्रकारांनी त्यांना गाठले असता आपल्याला आणखी नवे खाते नको, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचे रेल्वे खाते आपल्याला दिले जाणार असल्याची चर्चा आहे. या प्रश्‍नावर गडकरी यांनी ही चर्चा मीडितायच असल्याचे सांगितले. आपणास या संदर्भात कोणी विचारणा केली नाही. आपल्याकडे आधीच तीन खात्यांचा भार आहे. रस्ते, परिवहन व जहाजबांधणी खात्यात भरपूर कामे आहेत. तीच करताना दमछाक होत आहे. याच खात्यांमध्ये आणखी खूप काही करायचे आहे. त्यामुळे नव्या खात्याचा भार पेलण्यास वेळ देणे शक्‍य होणार नाही, असेही ते म्हणाले. 

कालच मी अमेरिकेहून आलो. मला आणखी एक खाते दिले जाणार असल्याचे मीडियातून कळाले. कुणाला कोणते खाते द्यावे, याचा अधिकार सर्वस्वी पंतप्रधानांचा आहे; पण सध्यातरी माझ्याकडे खूप काम आहे. असे सांगताना गडकरी यांनी अनेक देशांत, खासकरून अमेरिकेत रस्ते वाहतूक, नागरी उड्डाण, शिपिंग आणि रेल्वे ही पायाभूत सोयी-सुविधांशी संबंधित खाती एकाच विभागाकडे असतात, याकडेही लक्ष वेधले. 

Web Title: nagpur news nitin gadkari Devendra Fadnavis