परिचारिका करतात कारकुनी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

नागपूर - मुंबईच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील सहसंचालकांच्या कार्यालयापासून, तर मेयो आणि मेडिकलसह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनेक परिचारिका रुग्णसेवेचा धर्म सोडून कारकुनी कामात अडकलेल्या आहेत.

नागपूर - मुंबईच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील सहसंचालकांच्या कार्यालयापासून, तर मेयो आणि मेडिकलसह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनेक परिचारिका रुग्णसेवेचा धर्म सोडून कारकुनी कामात अडकलेल्या आहेत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सहसंचालक (नर्सिंग) कार्यालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून दोन परिचारिकांना आयात केले. परिचारिकांना रुग्णसेवेपासून दूर करीत लिपिकीय कामांत गुंतवले आहे. परिचारिकांना रुग्णसेवेसाठी परत पाठवण्यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली. प्रशासनाने परिचारिकांना रुग्णालयात परत पाठवावे, असा शेराही दिला. अद्याप परिचारिका सहसंचालकांच्या कार्यालयातच कार्यरत आहेत.

मेडिकलच्या एक्‍स-रे विभागात स्वागतकार कक्षासह रुग्णांना एक्‍स-रे, सोनोग्राफी व एमआरआय काढण्याची तारीख देण्याचे काम परिचारिकांच्या माथी मारले आहे. मेडिकल व सुपरच्या मेट्रन कार्यालयापासून, तर विविध विभागात सुमारे शेकड्यावर परिचारिका लिपिकीय कामांत गुंतल्याची माहिती सुत्रांनी दिली. याशिवाय ॲटोक्‍लेव्ह विभागातही पाच परिचारिकांची वर्णी लावली आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही हीच अवस्था आहे. रुग्णसेवेच्या कामात परिचारिकांचा तुटवडा जाणवत असतानाही सुपरच्या सर्वच विभागांत हृदयरोग, न्यूरोलॉजी, युरोलॉजी व गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागात परिचारिका लिपिकीय काम करीत आहेत. 

लाइट वॉर्डासाठी चढाओढ
मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणेच मेयो रुग्णालयातही परिचारिकांना कारकुनी कामात जुंपल्याचे दिसून येते. त्यांची या कामातून मुक्ती करावी, परिचारिकांना वॉर्डात काम द्यावे, काही वॉर्डात प्रचंड काम असताना संख्येने कमी परिचारिका कामावर असतात. लाइट वॉर्डात काम मिळविण्यासाठी परिचारिकांची चढाओढ असते. यासाठी अर्थव्यवहारही होत असल्याची जोरदार चर्चा आहे.

Web Title: nagpur news nurse work in government hospital