या घराचे अंगणही मालकीचे नाही!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

चांपा - सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. सगळीकडे हर्षोल्हास आहे. परंतु, चांपा येथील पारधी बांधवांना मात्र घरकुलाचा प्रश्‍न सतावतोय. येथे ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेले पारधी बांधव गावकुसाबाहेर झोपडी थाटून राहतात. त्यांना राहायला घर नाही. दिवाळीसारखा सण असून रांगोळी काढायला अंगण नाही. गरीब पारधी बांधवांचे घरच स्वतःचे नसल्यामुळे अंगणही त्यांच्या मालकीचे नाही. आपल्याला हक्‍काचे आंगण का मिळत नाही, असा हृदयस्पर्शी सवाल चिमुकल्या मुली अंगणात रांगोळ्या काढताना करतात तेव्हा दुःख होत असल्याचे नागरिक सांगतात.   

शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. परंतु, आजपर्यंत चांपा येथील पारधी  समाजातील लोकांना सरकारकडून एकही घरकुल मिळालेले नाही. ही योजना कोणासाठी आहे, असा प्रश्‍न त्यांना पडतो. सरकारकडून या योजनेचा लाभ खरोखरच चांपा येथील पारधी समाजातील लोकांना मिळालेला नाही. असेच इतरही योजनांचे आहे. आजपर्यंत योजनेचा लाभ कोणाला मिळतो, हे एक कोडेच या समाजातील नागरिकांना पडलेले आहे. आम्ही भारतातील नागरिक आहोत. आम्हाला घरकुल मिळालेच पाहिजे, असे चांपा येथील लालचंद पवार म्हणतात. आजपर्यंत विविध विभागांतील अधिकाऱ्यांना निवेदने दिलीत. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. ‘आमाले घर कवा मिळन जी,’ असा सवाल खेळण्याबागडण्याच्या दिवसात आयशा अनिल मारवाडी या चिमुकलीने केला.

Web Title: nagpur news pardhi community