पेट्रोलचा भडका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - पेट्रोलच्या दराने 85.45 रुपये प्रति लिटरपर्यंत मजल मारून लवकर विक्रम मोडीत काढण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी 2014 मध्ये 86 रुपयांपर्यंत पेट्रोलचे भाव गेले होते. त्यानंतर आता चार वर्षांनी पुन्हा त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, सातत्याने तीस-चाळीस पैशांनी भाव वाढत असल्यामुळे लवकरच जुना विक्रम मोडून नवा विक्रम रचण्याचीही शक्‍यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या चार आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर झाल्याचे इंधन कंपन्यांचे म्हणणे आहे.

नागपूर - पेट्रोलच्या दराने 85.45 रुपये प्रति लिटरपर्यंत मजल मारून लवकर विक्रम मोडीत काढण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी 2014 मध्ये 86 रुपयांपर्यंत पेट्रोलचे भाव गेले होते. त्यानंतर आता चार वर्षांनी पुन्हा त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, सातत्याने तीस-चाळीस पैशांनी भाव वाढत असल्यामुळे लवकरच जुना विक्रम मोडून नवा विक्रम रचण्याचीही शक्‍यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या चार आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर झाल्याचे इंधन कंपन्यांचे म्हणणे आहे. गेल्या सात दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये होणारी वाढ थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी ठरत आहे. 

पेट्रोल ः 85.45 
डिझेल ः 72.21
 

पेट्रोलचे दर 
दर---86---85.45 
वर्ष---2014---2018 (21 मे) 
(दर ः रुपये प्रति लिटर, आलेख ः अप्रमाणित) 

Web Title: nagpur news petrol