राज्यात घसरतोय ‘प्लेसमेंट’चा टक्का 

राज्यात घसरतोय ‘प्लेसमेंट’चा टक्का 

नागपूर - राज्यात कौशल्य विकासाला चालना देत, अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगार देण्याची घोषणा शासनाने केली. त्यासाठी दोन वर्षांपासून राज्यात ‘मेक इन महाराष्ट्र’ला चालना देत, बऱ्याच विदेशी कंपन्यांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचा दावाही शासनाकडून करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात दोन वर्षांत जवळपास विदेशी उद्योग सोडाच पण राज्यात असलेल्या कंपन्यांमध्येही सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या विविध कंपनीमधील ‘प्लेसमेंट’मध्ये बरीच घट झाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) ‘डॅशबोर्ड’मध्येच ते स्पष्टपणे उघड झाले आहे.  

राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या १ हजार ५४९ महाविद्यालये, विद्यापीठ, अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे. यातून ७७ हजार ८९३ विद्याशाखेत ४ लाख ४१ हजार ९१९ जागा असून त्यात २ लाख ३८ हजार ४४८ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. 

गेल्या चार वर्षांपासून अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना उतरती कळा आलेली आहे. त्यातूनच महाविद्यालयांमधील चाळीस टक्के जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात अभ्यासक्रम करून त्यातूनच चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळेल, अशी आशा घेऊनच विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतात. मात्र, गेल्या तीन वर्षांचा विचार केल्यास राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्लेसमेंटचा आकडा सातत्याने घट आहे. 

२०१३-१४  मध्ये राज्यात ६७ हजार २१९ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात आले होते. २०१४ -१५ मध्ये प्लेसमेंटचा आकडा ७२ हजार ७३३, २०१५-१६ मध्ये वाढ होऊन ७४ हजार ५२९ विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट देण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांचा विचार केल्यास केवळ ३० टक्केच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात आले. मात्र, २०१६-१७ या वर्षात राज्यातील ‘प्लेसमेंट’ अकरा हजारांनी घटून ६३ हजार ३४५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यात आले. विद्यार्थ्यांचा विचार केल्यास २०१६-१७ च्या तुलनेत यावर्षी वीस हजारांवर विद्यार्थ्यांची घट दिसून येत आहे. यापैकी अभियांत्रिकीमध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के जागा रिक्त असल्याचे चित्र आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com