पोलिस शिपायाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नागपूर - लोहमार्ग पोलिस दलातील शिपायाने अजनी रेल्वेस्थानकावर मालगाडीपुढे येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रेल्वे सुरक्षा दलातील जवानांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्याला ताब्यात घेऊन मंगळवारी वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

नागपूर - लोहमार्ग पोलिस दलातील शिपायाने अजनी रेल्वेस्थानकावर मालगाडीपुढे येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रेल्वे सुरक्षा दलातील जवानांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्याला ताब्यात घेऊन मंगळवारी वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

विनोद नामक हा शिपाई नरखेड तालुक्‍यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. तो बडनेरा येथे नियुक्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठावर केलेल्या तक्रारीसंदर्भातच्या कामासाठी तो नागपुरात आला होता. अनेक प्रयत्न करूनही वरिष्ठांना भेटू दिले जात नसल्याने संतापाच्या भरात अजनी स्थानकावर आला. फलाट क्रमांक २ वर उभा होता. फलाट क्रमांक १ वर मालगाडी येत असल्याचे लक्षात येताच तो धावत जाऊन रेल्वेरुळावर उभा झाला. हा प्रकार लक्षात येताच कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलातील जवानांनी त्याला हटकून बाजूला केले. मात्र, त्याने त्यांच्याशीच वाद घातला. या प्रकाराची माहिती लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लागलीच लोहमार्ग दलातील दोन उपनिरीक्षक आणि डीबी पथकातील कर्मचारी अजनी स्थानकावर दाखल झाले. त्याला ताब्यात घेऊन नागपूर ठाण्यात आणण्यात आले. मंगळवारी सकाळी वडिलांना बोलावून विनोदला त्यांच्या ताब्यात देणत आले. ठाणेदार त्रास देत असल्याचा विनोदचा आरोप असून, यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी ऐकून घेत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. या प्रकारासंदर्भात वरिष्ठांशी बोलू देण्याची त्याची मागणी असल्याचे सूत्रांकडून कळते. तर, दुसरीकडे विनोद वरिष्ठांना वारंवार धमक्‍या देतो. वरिष्ठांशी मुजोरीने वागत असल्याचा त्याच्यावर ठपका आहे. विनोदला नागपूर लोहमार्ग ठाण्यात आणण्यात आल्यानंतर त्याने रात्री चांगलाच गोंधळ घातल्याची माहिती आहे. यापूर्वीसुद्धा काटोल येथे असताना त्याने अशा प्रकारचा गोंधळ घातल्याचे सांगितले जाते.

Web Title: nagpur news police constable