कळमन्यातील डान्सबारवर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नागपूर - कळमन्यातील एच बी टाउन चौकातील पायल बारमध्ये सुरू असलेल्या डान्सबारवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. बारमध्ये चार बारबाला अर्धनग्न अवस्थेत बारमधील ग्राहकांसोबत अश्‍लील व गैरवर्तन करताना आढळल्या. पोलिसांनी बारमालक, चार बारबाला व ग्राहकांना अटक केली आहे.

नागपूर - कळमन्यातील एच बी टाउन चौकातील पायल बारमध्ये सुरू असलेल्या डान्सबारवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. बारमध्ये चार बारबाला अर्धनग्न अवस्थेत बारमधील ग्राहकांसोबत अश्‍लील व गैरवर्तन करताना आढळल्या. पोलिसांनी बारमालक, चार बारबाला व ग्राहकांना अटक केली आहे. बारमालक कमलेश हरिचंद नागपाल (५८), व्यवस्थापक महेश बलराम सचदेव, विपिन जितेंद्र लांडे, देवेंद्र अशोक हटवार, मुकेश सुरेश गावकर, विशाल रमेश बढहोल, धनराज चूडाम झोडापे, नितीन प्रमोद वायलवार, शहजाद खान महबूब खान, सय्यद मुजफ्फर अली, करण हरिदास रामटेके, तानाजी प्रेमचंद मोटे, प्रतीक ताराचंद केसरवानी, संदीप मुलचंद गुप्ता, प्रकाश लीलाधर पटोले, कपिल किशन पुनियानी, रोशन महादेव मेहर, विनोद दत्तूजी इंगळे, नंदकिशोर चकोले, सागर नीलचंद खोडे,  पारस श्‍यामराव वाहने, अमोल यादवराव मोहोड, हेमेंद्र टेकचंद रहांगडाले, अविनाश मारेश्वर हिंगणेकर, धीरज, अर्चना, सलोनी, दीपा व मोनिका या चार बारबाला, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पायल बारमध्ये डान्सबार सुरू होता. याबाबत पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना माहिती मिळाली. शुक्रवारी रात्री बावचे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे निरीक्षक ढेरे, बोराडे, कळमना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक खुशाल तिजारे, उपनिरीक्षक सचिन जाधव, हेडकॉन्स्टेबल छगन राऊत व कळमना पोलिसांनी बारमधील पहिल्या माळ्यावर छापा टाकला. तिथे बारबाला व ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत थिरकताना आढळले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.   

 आशीर्वाद कुणाचा?
कळमन्यातील पायल बारमध्ये काही पोलिसांच्या आशीर्वादाने अनेक दिवसांपासून बारबाला बिभत्स नृत्य करीत आहेत. शेवटी पोलिस उपायुक्‍त सुहास बावचे यांना स्वतःहून कारवाई करावी लागली. थेट उपायुक्‍तांनी कारवाईचा धडाका लावल्यामुळे अनेकांचे ‘सेटिंग’ बिघडले. अन्य बारमालकांनी पोलिस मित्रांशी संपर्क साधून ‘संरक्षण’ मिळणार की नाही? याबाबत खातरजमा करून घेतली. एमआयडीसी, हिंगणा, वाडी आणि अन्य काही पोलिस ठाण्यातील हद्दीतील डान्सबारला पोलिसांचे थेट संरक्षण मिळत असल्याची चर्चा आहे.

Web Title: nagpur news police crime vidarbha