‘पद्मावत’ला पोलिसांचे संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

नागपूर - प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरलेला संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाला पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही नागपूर पोलिसांनी आज (मंगळवार) सिनेमागृहाच्या मालकांना दिली. हा चित्रपट ठरल्याप्रमाणे २५ जानेवारीला प्रदर्शित होईल. मात्र, मल्टिप्लेक्‍समध्ये उद्याच (बुधवार) ‘पेड प्रिव्हिव्ह’ शो लागणार आहे.

‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी राजपूत करणी सेनेतर्फे आज निदर्शने करण्यात आली. पोलिसांनाही त्यांनी आपली बाजू मांडणारे निवेदन दिले. त्याचवेळी जवळपास दहा सिनेमागृहांच्या मालक आणि व्यवस्थापकांचे शिष्टमंडळ पोलिसांच्या भेटीला गेले होते. दोघांचेही म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या गृहविभागाने ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला संपूर्ण संरक्षण द्यायचे आहे. या आदेशाचा आधार घेत सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाने संरक्षण प्रदान करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. सेन्सॉरचे प्रमाणपत्र, चित्रपटातील आक्षेपार्ह बाबी वगळल्याचे प्रमाणपत्र, विविध राज्यांनी प्रदर्शनाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत निवेदनासोबत जोडण्यात आली. नागपुरातील जवळपास दहा सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. 

प्रत्येक सिनेमागृहाने किमान २५ पोलिसांचे संरक्षण मागितले असून या मागणीला ग्रीन सिग्नलही मिळाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान 

‘पद्मावत’ला पोलिसांचे संरक्षण
सिनेमागृह आणि प्रेक्षकांना कुठलीही हानी पोहोचू देणार नाही, असा विश्‍वास पोलिसांनी दिला. जवळपास अडीचशे पोलिस ‘पद्मावत’च्या संरक्षणार्थ सज्ज असणार आहेत. चित्रपटरसिकांसाठी ही आनंदाची बाब असली तरी सिनेमागृहांच्या व्यवस्थापनाची धाकधूक मात्र काही प्रमाणात कायम आहे, यात दुमत नाही.

Web Title: nagpur news police security to padmavat