पीआय महाडीक यांना राष्ट्रपती पदक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नागपूर - पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एमआयडीसीचे निरीक्षक सुनील महाडीक, नागपूर विभागाचे चीफ इंटेलिजन्स ऑफिसर सुनील लोखंडे आणि आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माताप्रसाद पांडे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले. 

नागपूर - पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल एमआयडीसीचे निरीक्षक सुनील महाडीक, नागपूर विभागाचे चीफ इंटेलिजन्स ऑफिसर सुनील लोखंडे आणि आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माताप्रसाद पांडे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले. 

सुनील महाडीक हे कृषी पदवीधर असून ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील उक्कडगाव (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी आहेत. महाडीक हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांचे शिक्षणदेखील ग्रामीण भागात झाले. १९९६ मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाले. त्यांनी आतापर्यंत मुंबई, सांगली, विशेष सुरक्षापथक, गुन्हे अन्वेषण विभाग येथे कार्य केले. मागील ४ वर्षांपासून ते नागपूर शहरात कार्यरत आहेत. त्यांची नेमणूक कायमच गृहमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात करण्यात येत असे. त्यामुळे नेहमीच त्यांनी राजकीय संवेदनशील ठिकाणी नोकरी केली आहे. मूळचे नागपूरचेच असलेले माताप्रसाद पांडे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून २५ जुलै १९७९ मध्ये ते नागपूर शहर पोलिस दलात दाखल झाले. आतापर्यंत त्यांनी प्रतापनगर, गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि पोलिस मुख्यालयात काम केले. सध्या ते वाहतूक शाखेत चेंबर २ येथे कार्यरत आहेत. गुन्हे शाखेत कार्यरत असताना गणेशपेठ येथील अपहरण प्रकरणातील आरोपीला भंडारा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातून पकडून आणले होते. या कामगिरीबद्दल तत्कालीन पोलिस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी त्यांचा गौरव केला होता.

पीआय महाडीक यांना राष्ट्रपती पदक
आतापर्यंत त्यांना १४० पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची पोलिस पदकासाठी निवड करण्यात आली. तसेच नागपूर विभागाचे चीफ इंटेलिजन्स ऑफिसर सुनील लोखंडे यांनासुद्धा राष्ट्रपतीचे पोलिस पदक जाहीर करण्यात आले. ते १९८४ मध्ये पोलिस दलात दाखल झाले. त्यांनी जालना, बीड, मुंबई पोलिस दलात सेवा दिली.२००९ मध्ये पीएसआय पदावर बढती मिळाली. त्यांना जानेवारी २०१७ मध्ये सहायक पोलिस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. मुंबईतील विशेष सुरक्षा विभागात त्यांनी सेवा दिली आहे.

आतापर्यंत ७०० रिवॉर्ड
आतापर्यंत सुनील महाडीक यांना ७०० बक्षिसे मिळाली असून, बहुतांश बक्षिसे हे गुन्ह्यांचा योग्य तपास व गुन्हे प्रतिबंधसाठी मिळाली आहेत. पोलिस खात्यात रुजू होण्यापूर्वी त्यांनी दुष्काळी रोजगार हमी योजनेवर मजुरी करून आपले शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले.

Web Title: nagpur news president award to sunil mahadik