प्रवासी युवतीची ‘ससे’होलपट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नागपूर - पाळीव ससे घेऊन जाणाऱ्या युवतीला हेकेखोर टीसीने सशांसह खाली उतरण्यास बाध्य केले. त्यामुळे तिची ‘ससे’होलपट झाली. ही संतापजनक घटना रविवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर नवी दिल्ली-बेंगळुरू राजधानी एक्‍स्प्रेसमधील घडली. 

सामिया अशरफ असे युवतीचे नाव आहे. ती दिल्ली येथील रहिवासी असून बेंगळुरू येथे राहणाऱ्या भावाकडे जात होती. राजधानीच्या बी-११ डब्यातून तिचा प्रवास सुरू होता. भावाच्या आग्रहामुळे घरचे चार पाळीव ससेही ती सोबत घेऊन जात होती. 

सामियाच्या तक्रारीनुसार, व्ही. प्रसन्न आराध्या नावाच्या टीसीने ससेसोबत नेण्याबाबत आक्षेप घेत दंड भरण्यास सांगितले. प्रारंभी तिच्याकडे तीन हजारांची आणि काही वेळातच साडेचार हजारांची मागणी केली. तिनेही दंड भरण्याची तयारी दाखविली.  मात्र, कमी असलेले ५०० रुपये बेंगळुरू स्थानकावर देण्याची मुभा देण्याची विनंती केली. पण, टीसीने नकार दिला.  

राजधानी एक्‍स्प्रेस नागपूर स्थानकावर येताच युवतीला रेल्वेखाली उतरण्याचे फर्मान सोडले. ती उतरली नाही. सहप्रवासीही तिच्या बाजूने उभे राहिले. पण, हेकेखोर टीटीने कोणाचेही न ऐकता स्वत:च ‘चेन पुलिंग’ करून गाडी थांबवली. तब्बल २० मिनिटे त्याने संपूर्ण गाडीच रोखून धरत प्रवाशांना वेठीस धरले. इरीस पेटलेल्या टीटीने रेल्वे कर्मचाऱ्याच्या मदतीने तिचे संपूर्ण सामान गाडीखाली फेकून तिलाही खाली उतरण्यास बाध्य केले. सुमारे अर्धा तास विलंबाने ही गाडी  पुढील प्रवासाला रवाना झाली. रविवार असल्याने तक्रार करता आली नाही. पण, सोमवारीच टीसीविरुद्ध तक्रार करणार असल्याचे सामियाने सांगितले.

असभ्य वर्तणुकीचा आरोप
सामियाच्या तक्रारीनुसार, टीसीने आग्रापासूनच त्रास देणे सुरू केले. रात्री २ वाजता झाशी स्थानकावर तिला उतरण्यास सांगितले. एकटी मुलगी असल्याने सहप्रवासी तिच्या बचावासाठी पुढे आले. प्रवाशांचा रोष बघून टीसी शांत झाला. पण, रात्रभर तो त्रास देत होता. नागपूर येण्यापूर्वी पुन्हा त्याने खाली उतरण्याचा आग्रह धरला. त्याने नियमबाह्यरीत्या हात लावून झोपेतून उठविण्यासह असभ्य वर्तणूक केल्याचा आरोप सामियाने केला.

स्वप्नावर फेरले पाणी
बीटेक असलेली सामिया बेंगळुरू येथे एका कंपनीत नोकरी मिळविण्यास इच्छुक होती. तिला तशी संधीही चालून आली. रविवारीच तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, टीसीने आडकाठी घातल्याने नोकरीची संधीच गमावल्याचे तिने डोळे पुसत सांगितले.

Web Title: nagpur news rabbit

टॅग्स