रेल्वेस्थानकावरील चप्पाचप्पा ‘दृष्टि’पथात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा दै. ‘सकाळ’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणला. सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने वर्षानुवर्षे रखडलेल्या इंटिग्रेटेड सेक्‍युरिटी सिस्टिमअंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा उभारणीची घाई केली. अडचणीतून मार्ग काढत आता सीसीटीव्ही यंत्रणेच्या उभारणीच्या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. एप्रिल अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कामे पूर्ण होताच रेल्वेस्थानकाचा चप्पाचप्पा कॅमेऱ्यांच्या दृष्टिपथात येणार आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावर एकात्मिक सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यात फुलप्रूफ सीसीटीव्ही यंत्रणा सर्वांत महत्त्वाची आहे. ही यंत्रणा उभारणीसाठी प्रशासनाकडून पूर्वीपासून प्रयत्नही केले. परंतु, यश आले नाही. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निविदाही काढण्यात आल्या. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रिया रद्द केली. सर्व अडचणी दूर सारत अखेर हा प्रकल्प मार्गी लावण्यात यश आले.

रेल्वेस्थानकावर तब्बल २४० अत्याधुनिक स्वरूपाचे सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र केबल लावण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच कॅमेरे लावले जाऊन त्यांची जोडणी करण्यात येईल. रेल्वेस्थानकाचा कोपरानकोपरा कॅमेऱ्यांच्या टप्प्यात असावा, यासाठी तपासणी करून कॅमेऱ्यांची जागा निश्‍चित केली. प्रशस्त कंट्रोलरूमही आवश्‍यक होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात कंट्रोलरूम सज्ज होत आहे. 

इल्लिगल एन्ट्रीला रोख
दै. ‘सकाळ’ने सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढताच खडबडून जागे झालेल्या रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. अनधिकृत प्रवेशाचे अनेक मार्ग बंद केले आहेत. अनधिकृत विक्रेत्यांना पूर्णत: आळा घालण्यात आला आहे. वाहनांच्या तपासणीसाठी प्रवेशद्वारावर अंडर व्हेकल स्कॅनिंग सिस्टीमही कार्यान्वित झाले आहे.

Web Title: nagpur news railway station cctv camera