सराफा व्यापाऱ्याला खंडणी मागणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नागपूर - मुलीचे अपहरण करण्याची धमकी देऊन चिठ्‌ठीद्वारे दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर सराफा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आदित्य रमेश पराये (वय 21, रा. अयोध्यानगर, हुडकेश्‍वर) असे आरोपीचे नाव आहे. 

राजेश लक्ष्मणराव आसटकर (वय 48, रा. आझाद हिंद चौक) यांचे बजाजनगरातील लक्ष्मीनगरातील आठ रस्ता चौकात भांडारकर ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. 17 मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या दुकानाच्या शटरमधून एका दुचाकीवरून चेहऱ्याला स्कार्फ बांधून आलेल्या युवकाने चिठ्‌ठी फेकली आणि पळून गेला. आसटकर दुकानात आल्यानंतर त्यांना चिठ्‌ठी दिसली. चिठ्‌ठीतील धमकी वाचून आसटकर यांना धक्‍काच बसला. त्यांनी लगेच बजाजनगर पोलिसांत धाव घेतली. चिठ्‌ठी दाखवून तक्रार दाखल केली. बजाजनगर पोलिसांनी दोन लाख रूपये मागितल्याच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिस उपायुक्‍तांनी गुन्हे शाखेचीही मदत घेतली. युनिट एकचे एपीआय गोरख कुंभार यांच्या पथकाने चोरट्याचा शोध घेतला. आज बुधवारी आरोपी आदित्य पराये याला इमामवाड्यातून अटक केली. 

सीसीटीव्ही फुटेजची मदत 
आरोपीने जरी चेहऱ्याला स्कार्फ बांधला होता. तो ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्यावरील सर्वच दुकानातील आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. आरोपीचा रस्ता आणि दुचाकीचे वर्णन लक्षात आल्यानंतर इमामवाडा परिसरातून आरोपीला अटक केली. 

Web Title: nagpur news Ransom demanding arrest crime