हुडकेश्‍वरमध्ये मुलीवर सामूहिक अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नागपूर - पाच आरोपींनी 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार केल्याची घटना हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात उघडकीस आली. पीडित आईवडिलासह पोलिस ठाण्यात गेली असता पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी तक्रार ऐकून घेतली नाही आणि बदनामी होईल, अशी भीती घालून परत पाठवले. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. हे प्रकरण पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांच्यावर चांगलेच शेकणार असल्याची पोलिस दलात चर्चा आहे. 

पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पोलिस दलात पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपक्रम व योजना हाती घेतल्या आहेत. पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी आयुक्‍त दिवसरात्र मेहनत घेत आहेत. परंतु, काही पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कार्याला काळिमा फासत आहेत. हुडकेश्‍वरमध्ये अल्पवयीन मुलीचे आरोपींनी अपहरण करून रात्रभर लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी तिला घरासमोर सोडून दिले. आईसह पीडित हुडकेश्‍वर ठाण्यात आल्यानंतर झावरे यांनी आरोपींना ताब्यात घेतले. मात्र, सायंकाळी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न करता सोडून दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यामध्येच उलटसुलट चर्चा सुरू होती. 

प्रसारमाध्यम व सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर यांनी प्रकरणाला वाचा फोडला. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली आणि पोलिस ठाण्यात महिला पोलिसांना हकिकत सांगितल्यानंतर झावरे यांना आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला. 

असंवेदनशील झाली खाकी 
अत्याचार पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे सोडून पोलिस निरीक्षक झावरे हे पोलिस ठाण्यात स्वतःचा वाढदिवस साजरा करीत होते. केक कापून मिठाई वाटत होते. मुलीच्या आईने तक्रार दाखल करण्याविषयी विनंती केली असता पोलिसांनी साहेबांचा वाढदिवस झाल्यावर केल्या जाईल, असे उत्तर दिले. त्यामुळे खाकी वर्दीतील माणुसकी हरविल्याची प्रचिती समोर आली. 

पोलिस निरीक्षकाला निलंबित करा 
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या हुडकेश्‍वर पोलिसांविरुद्ध सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर यांनी झावरे यांना लेखी तक्रार देऊन न्यायाची मागणी केली. पीआय झावरे यांनी प्रकरणात गांभीर्य न दाखवता आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रेवतकर यांनी केली. 

Web Title: nagpur news rape case