तीन महिलांसह एकावर बलात्काराचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नागपूर -  कॉल सेंटरला काम करणाऱ्या एका युवतीला तिच्या तीन मैत्रिणींनी फ्लॅटवर नेऊन कोल्डिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन एका युवकाकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना हुडकेश्वरमध्ये तेरा दिवसांनंतर समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिला आरोपींना अटक तर एक महिला आरोपी फरार आहे. पुरुष आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी सुप्रिया पाटील, लीना ऊर्फ श्रेया धांदे, अन्य एक युवती व एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडित युवती ही 21 वर्षीय असून ती कॉल सेंटरला काम करते. कॉल सेंटरला सुप्रिया पाटीलसोबत काम करीत असल्याने त्यांच्यात मैत्री होती. सुप्रियाच्या माध्यमातून कॅटरर्सचे काम करणाऱ्या लीनाशी ओळख झाली. 10 सप्टेंबर रोजी आरोपी दोघ्या मैत्रिणींनी पीडितेला आपल्या मैत्रिणीच्या भेटीकरिता मानकापूर येथील एका फ्लॅटवर नेले. या ठिकाणी तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध दिले. त्यामुळे ती बेशुद्ध पडताच फ्लॅटवर कुण्यातरी युवकाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पोलिसांच्या सूत्रानुसार, आरोपी युवकाने लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी फ्लॅटवर तीनही मैत्रिणी हजर होत्या. मैत्रिणींनी दगाफटका करीत आपल्या डोळ्यांदेखत ओळखीच्या युवकाकडून तिच्यावर अत्याचार करवून घेतला. या प्रकरणात पुरुष आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. घटनेनंतर आरोपींनी तिला धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने 13 दिवसांनंतर पोलिसठाणे गाठून तक्रार नोंदविली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन महिला आरोपींना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आवटे करीत आहेत. 

व्हिडियो शूटिंग केल्याचा संशय 
तीनही युवती या भलत्याच व्यवसायात असून त्यांनी मित्रासोबत पीडित युवतीचे शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे मोबाईलने फोटो आणि शूटिंग घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. या भीतीपोटीच युवतीने तक्रार केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

Web Title: nagpur news rape case crime