मित्राच्या पत्नीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नागपूर - घरात एकटी असलेल्या मित्राच्या पत्नीवर युवकाने बलात्कार केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मैत्रीच्या नात्याला कलंक फासणारी घटना जरीपटक्‍यात घडली. प्रवीण प्रभाकर सहारे (वय 25,दुर्गधामना) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि पीडित 28 वर्षीय महिलेचा पती एक-दुसऱ्याचे चांगले मित्र आहेत. गेल्या बऱ्याच वर्षांपासून दोघांमध्ये मैत्री आहे. त्यामुळे दोघांचा एकमेकांवर विश्वासही होता. शुक्रवारी महिलेच्या पतीची प्रकृती ठिक नसल्याने कामावर गेला नाही. मात्र, कंपनीतून वारंवार फोन येत असल्यामुळे त्याने मित्र प्रवीणला सहारेला घरी बोलावले. त्याला वाडी येथे असलेल्या कंपनीत सोडून मागितले. त्याला सोडून देताच प्रवीण थेट दुपारी बारा वाजता मित्राचे घर गाठले. त्याची 28 वर्षीय पत्नी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिकार केल्यामुळे तिच्यावर बलात्कार केला. पतीला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेने झालेल्या प्रकाराची माहिती पतीला दिल्यानंतर दोघांनी जरीपटका पोलिस स्टेशन गाठले आणि रीतसर तक्रार दिली. 

Web Title: nagpur news rape case crime