वसतिगृह अधिकक्षकाकडून वीस लाखाची अफरातफर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौक परिसरातील विद्यार्थी वसगृतील अधिक्षक व पदार्थविज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रकाश शेडमाके यांनी 20 लाख रुपयांवर अफरातफर केली. विद्यार्थ्यांनी मेससाठी दिलेला सुरक्षा निधीच अधिक्षकाने परस्पर काढत मोठा आर्थिक घोटाळा केल्याचे समोर आले आहे. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच शेडमाकेंचे निलंबन करीत पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. 

विधी कॉलेज परिसरातील वसतिगृहाच्या अधीक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी पदार्थविज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रकाश शेडमाके यांच्याकडे सोपवली होती. ते तीन वर्षे अधीक्षक होते. वसतिगृहाच्या मेससाठी प्रतिविद्यार्थी दोन हजार रुपये सुरक्षा ठेव घेतली जाते. ही रक्कम थेट बॅंकेत जमा केली जाते. हे बॅंक खाते वसतिगृह अधिक्षकाच्या नावाने असून त्यांच्या सहीनेच सर्व कारभार चालत असतात. वसतिगृह सोडताना विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेल्या अर्जानुसार ही दोन हजारांची जमा केलेली सुरक्षा ठेव धनादेशाद्वारे परत करण्यात येते. परंतु, डॉ. शेडमाके यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांची सुरक्षा ठेव परत केली नसल्याचे नवनियुक्त अधिक्षक डॉ. श्‍याम कोरटी यांच्या निदर्शनास आले. अनेकदा लाखोंची रक्कम शेडमाके यांनी बॅंकेतून स्वत:च काढून घेतली असल्याचे पाहणीत आढळून आले. त्याच्या काळात वसतिगृहात अनेक गैरप्रकार वाढल्याच्या तक्रारी कुलगुरू डॉ. काणे यांच्याकडे केली. त्यामुळे कुलगुरूनी डॉ. शेडमाके यांच्याकडील अधीक्षक पदाचा कार्यभार काढून डॉ. श्‍याम कोरेटी यांच्याकडे दिला. दरम्यान, डॉ. कोरटी यांनी त्याच्याकडील सर्व आर्थिक हिशेब मागितले. मात्र, तो देण्यास टाळाटाळ केल्याने डॉ. शेडमाके यांनी वसतिगृहाच्या मेससाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सुरक्षा ठेवीच्या रक्कमेत गैरप्रकार झाल्याचा संशय आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली आहे. समिती आपला अहवाल तीन दिवसात देणार असून त्यानंतर शेडमाकेचे निलंबन केले जाईल. तसेच पोलिसात तक्रार देणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. 

वर्षाला सहा लाख जमा 
वसतिगृहातील विद्यार्थी संख्येनुसार एका वर्षाला सहा लाखाहून अधिक रक्कम जमा होत असे. तीन वर्षात अठरा ते विस लाख रुपये जमा होतात. ही रक्कम शेडमाके यांनी काढून घेतली. त्यासाठी त्यांनी विविध खाजगी दुकांनाच्या नावाने चेकही तयार केल्याची माहिती आहे.

Web Title: nagpur news Residential Superintendent Fraud for Rs 20 lakh

टॅग्स