नागपूरमध्ये विधी विद्यापीठाची उपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या विधी विद्यापीठाची त्यांच्याच शहरात उपेक्षा होत आहे. गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने विद्यापीठाला दिलेल्या अनुदानावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथील विधी विद्यापीठांना मंजूर निधीमध्ये तफावत असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (बुधवार) नोंदविले. गेल्या सुनावणीतील आदेशांनुसार उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव सीताराम कुंटे यांनी आज तिन्ही विधी विद्यापीठांना देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. या प्रकरणावरील सुनावणीत याचिकाकर्ते हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने ऍड. सुधीर पुराणिक यांनी ही तफावत लक्षात आणून दिली.
Web Title: nagpur news Rituals University