प्रतापनगरातील घरफोडीचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नागपूर - प्रतापनगर ठाण्याअंतर्गत मंगळवारी दिवसाढवळ्या आर्किटेक्‍टच्या घरी चोरीची घटना घडली. प्रतापनगर पोलिसांनी १२ तासातच चोरीचा पर्दाफाश करीत चोरट्याला ताब्यात घेतले. अल्पवयीन चोरटा ठाण्यात सर्वांच्याच परिचित आहे.

नागपूर - प्रतापनगर ठाण्याअंतर्गत मंगळवारी दिवसाढवळ्या आर्किटेक्‍टच्या घरी चोरीची घटना घडली. प्रतापनगर पोलिसांनी १२ तासातच चोरीचा पर्दाफाश करीत चोरट्याला ताब्यात घेतले. अल्पवयीन चोरटा ठाण्यात सर्वांच्याच परिचित आहे.

मंगळवारी सकाळी अरुण भुते (६०, रा. दुर्गा मंदिरजवळ) वर्ध्याला गेले होते. सायंकाळी परतल्यावर कुलूप उघडले असता दरवाजा आतून बंद असल्याचे समजले. त्यांना चोरीचा संशय आला. घरामागे गेले असता स्वयंपाक खोलीचे दार उघडे होते. कपाटातील रोख आणि दागिने गायब होते. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड पथकासह घटनास्थळावर पोहोचले. प्राथमिक तपासानंतर त्यांनी डीबी पथकाला ठाण्याअंतर्गत असलेल्या सर्व चोरट्यांची चौकशी करण्यास सांगितले. यातून अल्पवयीनने चोरी केल्याचे समजले. पोलिस पथक अल्पवयीन चोरट्याच्या घरी गेले असता तो घरीच होता.  पोलिसी खाक्‍या दाखवून विचारपूस करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले. दागिने जप्त केल्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी केली.

२५ गुन्हे दाखल
अटकेतील अल्पवयीन बालकाचे वय १७ वर्ष ९ महिने आहे. आतापर्यंत त्याच्यावर २५  चोरीच्या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल आहे. सुधारगृहातून बाहेर येताच तो सक्रिय होतो. काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाल्याने तो बाहेर निघत नव्हता. यामुळे लवकर पोलिसांच्या हाती लागला.

Web Title: nagpur news Robbery crime