उत्पन्न मर्यादेची अट रद्द 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - आरटीईनुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी सुधारित कार्यपद्धती आखण्यात आली. यानुसार वंचित गटातील विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग, एसबीसी या सर्वांना आता अनुसूचित जाती-जमातींप्रमाणे बालकांच्या प्रवेशासाठी उत्पन्नाच्या मर्यादेची अट लागू राहणार नसल्याचा शासननिर्णय काढण्यात आला. त्यामुळे या प्रवर्गातील बालकांना नव्याने अर्ज करता येतील. 

शासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार आरटीई प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज करणे आवश्‍यक आहे. यासाठी ज्या जिल्ह्यांची पहिली फेरी, दुसरी फेरी पूर्ण झाली, त्या जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत अर्ज करता येईल. ज्या जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, त्या जिल्ह्यांना 25 मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून नव्याने 24 मे ते चार जूनपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. नव्या शासन निर्णयानुसार उत्पन्न मर्यादेची अट रद्द केलेल्या सर्व संवर्गांना जातप्रमाणपत्र देणे अनिवार्य राहील. 

नागपूर जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी पूर्ण झाली. मात्र, दुसऱ्या फेरीनंतरही अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे आता ज्या इतर मागासवर्ग, एसबीसी आणि भटक्‍या प्रवर्गातील बालकांना उत्पन्न अधिक असल्याने प्रवेश मिळाला नसेल अशांना संधी मिळणार आहे. यापूर्वी उत्पन्नाची मर्यादा एक लाखापर्यंत ठेवली होती. मात्र, ही अटच रद्द झाल्याने या निर्णयाचे सर्वच स्तरावर स्वागत होत आहे. 

नव्याने अर्ज करण्याची संधी 
आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा असल्याने अनेक पालकांनी अर्ज केले नाही. मात्र, आता नवीन निर्णयानुसार ज्यांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनाही नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. 

Web Title: nagpur news RTE issue Income limit cancellation