‘आरयूबी’ पुन:उभारणीसाठी सज्जता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नागपूर - कामठी मार्गावरील गुरुद्वारालगतचा मोडकळीस आलेल्या रेल्वे अंडरब्रिजच्या पुनर्उभारणीचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यासाठी आवश्‍यक तयारी आणि आठ तासांत कामे पूर्ण करण्याचे नियोजनही केले आहे. तूर्तास तडे गेलेल्या भागाची युद्धस्तरावर दुरुस्ती करून  रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. रस्ते वाहतूक बंद असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

गड्डीगोदाम परिसरातील गुरुद्वारालगतच्या गर्डरला तडे गेल्याचे शनिवारी दुपारी लक्षात आले.   रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने युद्धस्तरावर दुरुस्तीकार्य पूर्ण केले. यामुळे शनिवारी  मध्यरात्रीनंतर या मार्गावरून अत्यंत धिम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरू झाली. पुलाचा लोखंडी भाग जीर्ण झाला असल्याने संपूर्ण लोखंडी ढाचा बदलून घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. 

शनिवारच्या घटनेनंतर तातडीने हे काम पूर्ण करून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मनमाडवरून मागविण्यात आलेले अगडबंब लोखंडी गर्डर उचलण्यासाठी अजस्त्र क्रेनची गरज आहे. ही क्रेन मिळावी  यासाठी आज दिवसभर रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. 

रात्रीपर्यंत क्रेन उपलब्ध झाल्यास मध्यरात्रीनंतर २ वाजता कामाला प्रारंभ करून सकाळी ११ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा अभियांत्रिकी विभागाचा प्रयत्न आहे. त्यासाठी नियोजन करून संपूर्ण तयारी ठेवण्यात आली आहे. वरून रेल्वेवाहतूक सुरू असली तरी खालून होणारी रस्ते वाहतूक बंद ठेवली आहे. उत्तर नागपूरला जोडणारा हा मुख्य मार्ग बंद असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा  लागत आहे.

उभे दोन्ही गर्डर बदलणार
ब्रिटिशकालीन हा पूल दोन भागात विभागलेला आहे. डाउन रूट असलेला पूल मोडकळीस आला असल्याने संपूर्ण लोखंडी ढाचा बदलण्यात येणार आहे. दोन अगडबंब गर्डरला जोडणारे आडवे गर्डरही बदलविण्यात येणार आहे. पुलाखालील भागात असलेला लोखंडी पत्राही बदलण्यात येणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण 
रेल्वे पुलाजवळ शक्‍यतोवर वळण असू नये असा प्रयत्न असतो. यामुळे कर्व असलेल्या भागात फारसे रेल्वेपूल नसतात. गुरुद्वाराजवळील रेल्वे पूल मात्र २१ अंश वाक्र असलेल्या मार्गावर  असून तेच या पुलाचे वेगळेपण आहे. यामुळेच त्याला धोकाही जास्त आहे. 

Web Title: nagpur news RUB