साईचरणी सोन्याची थाळी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

नागपूर - विदर्भातील प्रतिशिर्डी अर्थात वर्धा मार्गावरील प्रसिद्ध साईबाबा मंदिरात  चर्म चरण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी साईभक्तांनी एकच गर्दी केली. तब्बल ४१ वर्षांनंतर जुळून आलेल्या योगाचा नागपूरकरांनी लाभ घेतला. या वेळी एका भाविकाने साईचरणी १ किलो ५० ग्रॅम वजनाची ३३ लाख रुपये किमतीची सोन्याची थाळी अर्पण केली. 

साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या सहकार्याने श्रीसाईबाबा सेवा मंडळ, श्रीसाई मंदिर, विवेकानंदनगर यांनी पादुका दर्शनासाठी दिवसभराचा नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला होता. 

याअंतर्गत सकाळी ५.१५ वाजता काकड आरती झाली. यानंतर भक्तांनी पादुकांचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या व्यक्तीचे दर्शन होईपर्यंत पादुकांचे दर्शन घेण्याची सोय  उपलब्ध करण्यात आली.  सकाळी ६.४५ वाजता श्रीनाथ पिठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा झाला. या वेळी श्रीसाईबाबा सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयबाबा कोंद्रा उपस्थित होते.  सकाळी ७ वाजता शिर्डी येथून आलेल्या पुजाऱ्यांच्या हस्ते साईबाबांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिराचा आरंभ झाला. 

दहा हजार किलोंचा महाप्रसाद
चर्म चरण पादुकांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला बुंदी प्रसादाचे वाटप करण्यात  आले. मंदिरातर्फे दहा हजार किलोग्रॅम बुंदीचा प्रसाद तयार करण्यात आला होता. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुमारे ४५० स्वयंसेवकांनी सेवा दिली. साई मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या गजानन महाराज मंदिर आणि राम मंदिर लगतच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. 

आवाहनाला भक्तांची साद 
साईबाबा मंदिरातर्फे मोफत दवाखाना, मुली स्वयंनिर्भर होण्यासाठी मोफत टेलरिंग प्रशिक्षण आदी योजना सुरू करण्यात येणार आहे. मंदिराच्या समोरच्या परिसरात पक्के शेड टाकण्यात येणार  आहे. तसेच साईबाबांच्या ओट्यासमोरील आणि आजूबाजूच्या परिसरात सोन्याचा मुलामा चढविण्याचा मानस संस्थानने व्यक्त केला होता. या सर्व कार्यांसाठी भक्तांना सढळ हस्ते सहकार्य करण्याचे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले होते. संस्थानतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला भाविकांनी साद देत मोठ्या प्रमाणात देणगी दिली. 

Web Title: nagpur news sai baba gold