‘सकाळ’ने सुचविलेले धंतोली ‘मॉडेल’ धरमपेठेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नागपूर - धंतोलीच्या गल्ल्यांमधील ‘ब्लॉकेज’ काढल्यानंतर तशाच पद्धतीचा वापर वाहतूक शाखेतर्फे धरमपेठेत गुरुवारपासून केला जात आहे. धंतोलीमधील पार्किंगची समस्या विस्तृत पद्धतीने मांडताना ‘सकाळ’ने काही काही उपायही सुचविले होते. त्यानुसार धंतोलीमधील समस्या बऱ्याच अंशी मार्गी लागली आहे. आता त्याच धर्तीवर गजबजलेल्या धरमपेठेतील कोंडी फोडण्यात येणार आहे.  

‘सकाळ’ने सुचविलेला पॅटर्न
धंतोलीतील समस्येवर ‘सकाळ’ने धंतोलीतील ‘ब्लॉकेज’ या मथळ्याखाली वृत्तमालिका प्रकाशित केली होती. तसेच पार्किंगबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून तोडगाही प्रशासनाच्या दरबारी पोहोचविला होता. याची दखल घेत धंतोलीमधील काही मार्ग ‘वन वे’ करण्यात आले तर काही भाग पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आला. यामुळे कोंडीची समस्या बऱ्याच अंशी कमी झाली आहे. ‘सकाळ’ने सुचविलेला हाच पॅटर्न धरमपेठेत राबविण्यात येत आहे.

साहेब, इथे दोनचाकी... तिथे चार चाकी पार्क करा
 धरमपेठेत पार्किंगची मोठी समस्या आहे. बाजारात येणारी व्यक्‍ती कुठेही पार्किंग करतो. यामुळे अनेकदा किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वाहनचालक व दुकानदार यांच्यात  शाब्दिक चकमही नेहमीच्याच. त्यावर मात करण्यासाठी लॉ कालेज चौक ते शंकरनगर चौक दरम्यान तसेच इतर क्षेत्रात दुचाकी आणि चारचाकी पार्किंगसाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. रस्त्याच्या ठरावीक अंतरावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगच्या जागेचे फलक लावण्यात आले आहे. प्रशासनाच्या या पावलाचे काही जणांकडून स्वागत करण्यात आले तर काहींनी विरोध दर्शविला आहे. 

स्थानिक रहिवाशांना वाहनांच्या पार्किंगचा फारच त्रास होतो. आता जागा निश्‍चित झाल्याने आमचा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
- डी. आर. ठक्कर, स्थानिक रहिवासी

सर्वांची सोय होईल
धरमपेठेतील वाहतुकीच्या कोंडीचा नागरिकांना त्रास होत असल्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला काही दिवस गैरसोय होईल. मात्र, त्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे अशी वाहनचालकांकडून अपेक्षा आहे. मात्र, जाणीवपूर्वक कुणी नियमांचे उल्लंघन करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- रवींद्रसिंग परदेशी, पोलिस उपायुक्‍त, (वाहतूक)

स्थानिक रहिवाशांना वाहनांच्या पार्किंगचा फारच त्रास होतो. आता जागा निश्‍चित झाल्याने आमचा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
- डी. आर. ठक्कर, स्थानिक रहिवासी

Web Title: nagpur news sakal traffic