गो गॅस एलिट कॉम्पोझिट एलपीजी सिलिंडरवर आकर्षक योजना

गो गॅस एलिट कॉम्पोझिट एलपीजी सिलिंडरवर आकर्षक योजना

नागपूर - कॉन्फिडन्स समूहाने गो गॅस एलिट कॉम्पोझिट एलपीजी सिलिंडरला शहरातील सिनेमॅक्‍स, पीव्हीआर, लॅण्डमार्क, पुरुषोत्तम सुपर बाजारमध्ये प्रथमच सादर केले. नागरिकांसमोर हे सिलिंडर सादर केल्यानंतर महिलांच्या पंसतीत उतरल्याचा दावा संचालकांनी केला आहे. सिलिंडर नवीन तत्रंज्ञानापासून तयार केले आहे. ग्राहकांसाठी सर्वच ठिकाणी कंपनीने वेगळे स्टॉल लावले असून, अधिकाऱ्यांकडून त्याबद्दल माहिती दिली जात आहे. विशेष योजनेअंतर्गत ग्राहकांना एलिट कनेक्‍शन ४,३९९ रुपयात देण्यात येत आहे.

त्यात सिलिंडर, ट्यूब, रेग्युलेटरसह ३,९९९ किमतीची शेगडी मोफत दिली जात आहे. शेगडी तीन बर्नरची असून, ऑटो इग्निशन लावलेले आहे. सोने पे सुहाना ही ऑफर ग्राहकांच्या फायद्याची असून, अधिक सुरक्षित आहे. ही योजना अल्प कालावधीसाठी आहे. गो गॅस एलिट कॉम्पोझिटर एलपीजी सिलिंडर लोखंडाच्या सिलिंडरपेक्षा निम्म्या वजनाचे आहे. पारदर्शक असल्याने ग्राहकांना सिलिंडरमध्ये असलेला गॅसही सहज दिसू शकतो. यामुळे ग्राहकांची वचनाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून दिलासा मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com