गणवेशाचे अनुदान आता थेट खात्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश मिळणार असून त्यासाठी १ कोटी ९ लाख ५६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या वर्षीपासून विद्यार्थ्यांना स्वत: गणवेश खरेदी करावा लागणार आहे. मात्र, गणवेशाचे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा होतील. त्यासाठी खरेदीची पावती शाळेत सादर करावी लागणार आहे.

नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश मिळणार असून त्यासाठी १ कोटी ९ लाख ५६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या वर्षीपासून विद्यार्थ्यांना स्वत: गणवेश खरेदी करावा लागणार आहे. मात्र, गणवेशाचे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा होतील. त्यासाठी खरेदीची पावती शाळेत सादर करावी लागणार आहे.

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत गणवेश दिला जातो. तर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मनपा स्वखर्चाने गणवेश देणार आहे. गोपाल  बोहरे शिक्षण समिती सभापती असताना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. यंदाही ती परंपरा कायम ठेवली जाणार आहे. सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. यासाठी शासनाकडून प्रती विद्यार्थी  गणवेशाकरिता (२ जोड) ४०० रुपये प्राप्त होतात. ४०० रुपयांत दोन गणवेश घेणे शक्‍य नसल्यामुळे मनपा या विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्रतिविद्यार्थी २०० रुपये देणार आहे. तर, ज्यांना शासकीय योजनेतून अर्थात सर्वशिक्षा अभियानातून गणवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६०० रुपये गणवेशाकरिता दिले जातील. शुक्रवारी (ता.९) स्थायी समितीत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे 

असा होणार खर्च...
अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या २००० विद्यार्थ्यांसाठी १२ लाख, पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या ६ हजार ९९२ विद्यार्थ्यांच्या गणवेशावर ४१.३५ लाख, ९ हजार १२७ विद्यार्थिनींच्या गणवेशावर १८.२५ लाख, एससी प्रवगार्तील १ हजार ३१४ विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता २.६२ लाख, एसटी प्रवर्गातील ५८४ विद्यार्थ्यांच्या गणवेशावर १.१६ लाख  तसेच बीपीएल प्रवर्गातील ३१५ विद्यार्थ्यांसाठी ६३ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.  नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशावर १७.१७ लाख रुपये तसेच विद्यार्थिनींच्या गणवेशावर १६.३३ लाख रुपये खर्च होईल. नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वितरण केले जाणार आहे. यासाठी ३०.३८ लाख रुपये खर्च येणार आहे.

Web Title: nagpur news school uniform vidarbha