‘...जाने दो साब, पापी पेट का सवाल है’

केवल जीवनतारे 
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नागपूर - दोघेही चुलत भाऊ...दोघांचेही नाव प्रकाश सिंग बावरी. एक प्रकाशसिंग मिठ्ठूसिंग बावरी तर दुसरा प्रकाशसिंग जंगसिंग बावरी. दोघेही पंचविशीतील तरुण. तवा, बादली, कढई असो की लोकोपयोगी धारदार शस्त्र तयार करण्याचे कौशल्य हातात आहे. परंतु त्यांच्या या कौशल्याला प्रशिक्षणाची जोड शासनाने दिली नाही.

नागपूर - दोघेही चुलत भाऊ...दोघांचेही नाव प्रकाश सिंग बावरी. एक प्रकाशसिंग मिठ्ठूसिंग बावरी तर दुसरा प्रकाशसिंग जंगसिंग बावरी. दोघेही पंचविशीतील तरुण. तवा, बादली, कढई असो की लोकोपयोगी धारदार शस्त्र तयार करण्याचे कौशल्य हातात आहे. परंतु त्यांच्या या कौशल्याला प्रशिक्षणाची जोड शासनाने दिली नाही. शिक्षण-प्रशिक्षणासंदर्भात विचारले असता, ‘जाने दो...साब, काहे की कौशल्य योजना, काहे का शिक्षण, काहे का प्रशिक्षण...पापी पेट का सवाल है, इसलिये...भटकती आत्मा जैसा ये चिजे बेचने घरसे निकलते है...’ दिवसभराची भटंकती करूनही पंचविशीतील तरुणांच्या हाती सायंकाळी तीनशे रुपये नसतात, ही खंत त्यांनी व्यक्त केली. 

सिख सिकलगार समाजातील युवकांची जिंदगी स्वातंत्र्यासाठी सत्तरीनंतरही शस्त्रांच्या धारेवर आहे.  

खेळण्या-बागडण्याच्या वयात सिख सिकलगार समाजातील मुलांच्या हाती पोटासाठी धारदार चाकू, सुरा तयार करण्याची वेळ येते. पोटाचा सातबारा भरण्यासाठी तवा, बादली, कढई असो की, धारदार शस्त्र...तयार करण्यापासून सुरू झालेल्या आयुष्याची संध्याकाळ लोखंडी वस्तू तयार करताना होते. कौशल्यातून लोकोपयोगी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय असताना शासनाची कौशल्य विकास योजना एकाही तरुणापर्यंत पोहोचली नाही. ना शिक्षण ना घर...घरकुलासाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला, परंतु अद्याप घरकुल मिळाले नसल्याची खंत उत्तर नागपुरातील प्रकाश सिंग मिठ्ठुसिंग आणि प्रकाशसिंग जंगसिंग यांनी व्यक्त केली. दोघांची चौथी पिढी या व्यवसायात आहे. या समाजात ०.१ या प्रमाणापेक्षाही कमी शिक्षण आहे. 

बच्चे को साहब बनाऊंगा - बावरी 
कपाळावर गुन्हेगार हा ठपका घेऊन जगत असल्यामुळे संशयित नजरा आजही आमच्याकडे रोखून बघतात. कौशल्य ठासून भरले आहे, परंतु आमच्या कौशल्याचा उपयोग नाही. परिस्थितीमुळे शाळेत न जाता मुलांच्या आयुष्याला शस्त्राची धार लावण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु बच्चे को चाकू-सुरी तयार करण्याच्या ‘कले’पासून दूर ठेवणार. मेरे बच्चे को पढाऊंगा..बडा आदमी बनाऊंगा साहब...असे म्हणत चहाचे झुरके घेत एका ग्राहकाला कढई विकण्यासाठी पुढे निघून गेला. 

Web Title: nagpur news Sikh Sikalagar Samaj