‘सोलर सिग्नल’ने वाहतुकीवर नियंत्रण

‘सोलर सिग्नल’ने वाहतुकीवर नियंत्रण

नागपूर - शहराच्या चारही दिशेने मेट्रो रेल्वेची कामे सुरू असून, अनेक रस्ते अरुंद  झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल बंद झाल्याने समस्या निर्माण झाली. मात्र, महामेट्रोने ‘सोलर सिग्नल’चा उपाय शोधून काढला असून, मेट्रोची कामे सुरू असलेल्या चौकांमध्ये लावले आहेत. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे दूर होणार असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने शहरात होऊ घातलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत आता आधुनिक सोलर सिग्नल बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नागपूर बनावटीचे सोलर सिग्नलची बॅटरीची क्षमता दीर्घकाळ टिकण्याची आहे. आधुनिक सोलर सिग्नल स्वयंचलित असून, आवश्‍यकतेनुसार त्यात बदलही करता येतात. याशिवाय गरजेनुसार ते विजेवरदेखील चालवता येणार आहे.

यासाठी विशिष्ट व्यवस्था सोलर सिग्नलमध्ये करण्यात आली आहे. ‘सोलर सिग्नल’ला चालवणारे सॉफ्टवेअरही गरजेनुसार बदलता येते. सोलर सिग्नलचे संचालन सर्वसामान्य व्यक्तीलाही करणे शक्‍य आहे. एखादा व्यक्तीही सोलर सिग्नल संचालित करू शकतो तसेच सॉफ्टवेअरमुळे ते स्वयंचलितही आहे. या उपकरणात जीपीएस प्रणाली असून या माध्यमानेसुद्धा सिग्नलचे संचालन होणार आहे. सोलर सिग्नलमध्ये तब्बल १६ तास चालणारी १०० वॉट क्षमतेची बॅटरी असून उंची जमिनीपासून १२ फूट आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या नजरेस अगदी सहजपणे सिग्नल पडत असल्याचेही महामेट्रोने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. सिग्नल ट्रॉलीवर बसविण्यात आले असून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर हलविता येते. सिग्नल आणि ट्रॉलीचे एकत्रित वजन ३०० किलो असून कुठल्याही परिस्थितीत ते सुरू असते. यावर देखभाल दुरुस्तीचा खर्चही नसल्याने महामेट्रोवरील आर्थिक ताणही कमी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com