आता ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - फवारणी करताना विषबाधेमुळे गेल्या हंगामात राज्यात 40 पेक्षा अधिक शेतकरी व शेतमजुरांना जीव गमवावा लागला. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे फवारणी केली जाणार आहे. दिल्लीतील कृषिभवनमध्ये आयआयटी बंगळुरूच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ड्रोनचे सादरीकरण करण्यात आले. 

यवतमाळ जिल्ह्यात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यावर नियंत्रणासाठी शिफारसीत नसलेल्या रसायनांचे मिश्रण करून फवारणी करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी कापसाला शिफारसीत नसलेल्या किडनाशकाची फवारणीदेखील केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते. अनियंत्रित आणि शिफारसीत नसलेल्या कीडनाशकाची फवारणी करणाऱ्या तब्बल 22 शेतकऱ्यांना एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जीव गमवावा लागला. राज्यात फवारणीत विषबाधा होत मरणाऱ्यांची संख्या 40 वर पोचली. त्यानंतर विविध समित्यांचे गठण करून विषबाधेमागील कारणांचा वेध घेण्याचे प्रयत्न झाले. 

अशी होईल फवारणी 
ड्रोनद्वारे 15 लिटर कीडनाशक फवारणी शक्‍य होईल. ड्रोनची बारा फुटांपर्यंत उंची अपेक्षित धरली आहे. ड्रोनच्या माध्यमातून एक हेक्‍टर फवारणी अवघ्या साडेचार मिनिटात होणार आहे. राज्यात प्रायोगिक तत्त्वावरील या उपक्रमासाठी कृषी विभागस्तरावर ड्रोनची खरेदी केली जाणार आहे. विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर हे ड्रोन राहतील. शेतावर कीडनाशक फवारणी करून देण्याचे याअंतर्गत प्रस्तावित आहे. 

Web Title: nagpur news Spray on crops by drone