महापौरांनी थोपटली पाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नागपूर - महापालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. महापालिका शाळांतील शिक्षण उच्चदर्जाचे असल्याचे अधोरेखित करून प्रशासनाच्या प्रयत्नांत खारीचा वाटा उचलणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची महापौर नंदा जिचकार यांनी पाठ थोपटली. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन गौरव केला.

नागपूर - महापालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. महापालिका शाळांतील शिक्षण उच्चदर्जाचे असल्याचे अधोरेखित करून प्रशासनाच्या प्रयत्नांत खारीचा वाटा उचलणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची महापौर नंदा जिचकार यांनी पाठ थोपटली. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन गौरव केला.

महापालिका शाळांचा निकाल ६७.३६ टक्के लागला आहे. यात मराठी माध्यमाच्या शाळांचा निकाल ७१.०६, हिंदी माध्यमाच्या शाळांचा निकाल ५८.३१, तर उर्दू माध्यमाचा सर्वाधिक ८७.४४ टक्के निकाला लागला.  मराठी, हिंदी व उर्दू माध्यमातील यशवंतांचा गौरव करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात छोटेखानी समारंभ आयोजित केला. 

कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार, शिक्षण सभापती दिलीप दिवे, महिला व बाल कल्याण सभापती वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे, दुनेश्‍वर पेठे, मनोज चापले, नागेश सहारे, उपायुक्त रंजना लाडे, कार्यकारी शिक्षणाधिकारी मीना गुप्ता होत्या. यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांचा गौरव करीत ‘कॉन्व्हेंट कल्चर’च्या भाऊगर्दीत मनपा शाळांनी मिळविलेले यश नक्कीच वाखाणण्याजोगे आहे, असे नमूद केले. यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही गौरव केला. 

मराठी माध्यमातून ऋतिक ढोंगडे चमकला
मराठी माध्यमातून तन्वी मोडघरेने ९६.२०, ऋतिक ढोंगडेने ९२.००, मोनिका नेवारेने ९०.८० टक्के गुण घेतले. या माध्यमातून दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऋतिकनेही प्रतिकूल स्थितीवर मात करीत यश संपादन केले. त्याला वडील नसून, आई हातमजुरी करते. ऋतिकने शाळेचेच नाव नव्हे, तर आईलाही सर्वोच्च सुख मिळवून दिले. त्याला सिव्हिल इंजिनिअर व्हायचे आहे.  

हिंदीतून भूपेंद्र शाहूने मिळवले यश
हिंदी माध्यमातून संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या भूपेंद्र शाहू या विद्यार्थ्याने ९४.८० टक्के गुण घेत महापालिकांच्या शाळांतून दुसरे स्थान पटकावले. विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या रोशनी बब्बू शुक्‍लाने ८७.४० टक्के, तर लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेच्या जान्हवी सोनकुसरेने ८५.४० टक्के गुण पटकावले.

दिव्यांगांतून प्रीतीची चकमदार कामगिरी
महापालिकेच्या शाळांमधील दिव्यांगातून अव्वल स्थान पटकावण्याची कामगिरी प्रीती पांडुरंग ब्राह्मणकर या विद्यार्थिनीने केली. तिने ७७.८० टक्के गुण मिळविले. प्रीती भंडारा जिल्ह्यातील असून, ती येथे वसतिगृहात वास्तव्यास होती. धुळ्याच्या राजेंद्र दौलत पाटीलने ७७.०० टक्के गुण घेतले. प्रीतीप्रमाणे तोही येथील वसतिगृहात वास्तव्यास होता. व्हीलचेअरवर तो शाळेत जायचा. दुर्गेश कांचनप्रसाद शाहूने ७०.८० टक्के गुण घेतले.

उर्दू माध्यमातून सानिया परवीन अव्वल
महापालिकेच्या उर्दू माध्यम शाळांतून सानेगुरुजी उर्दू माध्यमिक शाळेच्या सानिया परवीन अब्दुल कदीरने ८८.४० टक्के गुण घेत अव्वल स्थान पटकावले. याच शाळेच्या हुसेन शेख सलीम खानने ८७.८० टक्के, तर मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक शाळेच्या मोहम्मद रशीद मोहम्मद गुलाम मुस्तफाने ८४.६० टक्के गुण पटकावले. 

Web Title: nagpur news ssc result municipal school