शुक्रवारी भिंतीवर उधळणार रंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

नागपूर - भारतीय जनता युवा मोर्चा महानगर, क्रिडाई यांच्या वतीने येत्या शुक्रवारी (ता. पाच) नागपूर माय सिटी, माय वॉल या उपक्रमाअंतर्गत स्ट्रीट वॉल पेंटिंग स्पर्धा होत आहे. यात ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असून, सकाळी आठ ते दुपारी तीन यावेळेत आर्टिस्ट आणि विद्यार्थी भिंतीवर रंग उधळणार आहेत.

पाच जानेवारीला सकाळी आठपासून क्रीडा चौक, हनुमाननगर आणि आंबेडकर कॉलेजसमोर दीक्षाभूमी येथे ही स्पर्धा दोन गटांत सुरू होईल. यात बदलते शहर आणि विकास, महाराष्ट्राचा इतिहास, आपले सैन्य आणि पोलिस आदी विषयावर भित्तिचित्रे रेखाटायची आहेत. पहिल्या गटात २५ पेक्षा अधिक वयोगटातील आर्टिस्ट, तर विद्यार्थी गटात १८ ते २५ वयोगटातील तरुण सहभागी होतील. एका गटात तीनजण असतील. नोंदणीसाठी ९९ रुपये भरावे लागेल. परीक्षणानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता संत रविदास सभागृह, विमा दवाखाना हनुमाननगर येथे बक्षीस वितरण होईल. या स्पर्धेसाठी क्रिडाई, सकाळ, महाराष्ट्र महिला अर्बन को-ऑप. सोसायटी, ॲविस फिटनेस स्टुडिओ, सेंट्रल टाइम्स, विदर्भ मीडिया, ओम साई फोटो स्टुडिओ, खंगार कॅटरर्स, नगरसेवक संदीप गवई, भाजपचे देवेन दस्तुरे यांचे सहकार्य लाभले आहे. नोंदणीसाठी ९५९५८५३२६६, ८२३७९९९३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: nagpur news street wall painting competition