विद्यार्थिनीचे अपहरण  करून सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नागपूर - रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्याने पायी घरी जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीचे दोघांनी दुचाकीवर बळजरीने बसवून अपहरण केले. एका पडक्‍या घरात नेले आणि दोरीने हातपाय बांधून रात्रभर सामूहिक बलात्कार केला. मदतीसाठी तिने आरडाओरड केली; पण निर्जन स्थळ असल्याने तिला मदत मिळू शकली नाही. पहाटेच्या सुमारास युवतीने आरोपींच्या तावडीतून पळ काढून पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी अनोळखी दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.  ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 

पीडित १८ वर्षीय युवती वृषाली (बदललेले नाव) ही जरीपटक्‍यातील धम्मज्योती नगरात राहते. बारावीची परीक्षा संपल्यामुळे तिने ब्युटी पार्लरच्या क्‍लासेसला प्रवेश घेतला. 

शनिवारी सायंकाळी ती घरून पायी क्‍लासला गेली. परंतु, क्‍लासला सुटी असल्यामुळे ती मैत्रिणीकडे जाण्यास निघाली. रात्री आठ वाजता निर्जन रस्त्यावर एकट्या युवतीला पाहून दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी तिला हटकले. तिने मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगितले. रस्त्याने मदतीसाठी कुणीही नसल्याचे पाहताच तिला दुचाकीने सोडून देऊ का, अशी विचारणा केली. वृषालीने नकार दिला व पुढे निघाली. आरोपींनी तिच्यासोबत अश्‍लिल चाळे करणे सुरू केले. बळजबरीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. तिला कामठी नाका क्रमांक २ जवळील एका कोपऱ्यात असलेल्या पडक्‍या घरात नेले. तेथे दोरीने हातपाय बांधले तर तोंडाला रूमाल बांधला. दोघांनीही दारू ढोसून रात्रभर सामूहिक बलात्कार तसेच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. पहाटेच्या सुमारास आरोपी झोपल्याचे पाहून युवतीने तेथून पळ काढला. तिने थेट जरीपटका पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना हकिकत सांगितली. तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी दोन युवकांविरुद्ध सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रकरण संशयास्पद
पीडित युवतीला आरोपींबाबत माहिती नसल्याने अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अपहरण केल्यानंतर कामठी रोडने जात असताना ती युवती ओरडली नाही तसेच तिने कुणाला मदतही मागितली नाही. त्यामुळे आरोपी हे वस्तीतीलच असावे. त्या युवतीचे एकाशी प्रेमसंबंध असून, मित्राने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळेच युवतीने तक्रार केल्याची चर्चा परिसरात आहे.

Web Title: nagpur news student gang rape