१२ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

सावनेर- शाळा सुरू होऊन १५ दिवस लोटूनही स्कूलबॅग घेऊन न दिल्याने सातवीतील मुलाने रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घराच्या धाब्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवम राजेश कोहळे (वय १२, माळेगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.

तीन मुलींच्या पाठी मुलाचा जन्म झाल्याने माळेगाव रहिवासी राजेश कोहळे हे नेहमी मुलाचा लाड पुरवायचे. म्हणेल तेव्हा, मागेल ते शिवमला घेऊन द्यायचे. त्याला वडिलांकडून हट्ट पुरवून घेण्याची सवय झाली. तो हुशार होता. मैदानी खेळात तरबेज होता. शेतीचेही नांगरण-डवरण करण्यात पटाईत होता. त्यामुळे गावात व परिसरात तो इतरांचा चाहता होता. २६ जूनला शाळा सुरू झाल्याने त्याने वडिलांकडे स्कूलबॅगचा हट्ट धरला होता. वडील शेतीच्या कामात व्यस्त असल्याने नंतर घेऊ, असे म्हणत त्यांनी टाळाटाळ केली. रविवारी मुलगा सकाळपासून बाहेर खेळण्याकरिता गेला होता. तो दुपारी बाराला घरी परतला. आईवडील शेतात गेले होते. स्कूलबॅग घेऊन न दिल्यामुळे घराच्या धाब्यावर जाऊन त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Web Title: nagpur news student suicide