घरमालकाच्या जाचाला कंटाळून युवतीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

नागपूर - अकरावीत शिकणारी शबनम प्रकाश डोंगरे (१७, रा. कौशल्यानगर) या विद्यार्थिनीने घरमालकाच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

शबनम ही आई आणि दोन भावांसोबत कौशल्यानगरात किरायाने राहत होती. ती धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये शिकत होती. शबनमच्या आईने घरमालकाला १० हजार रुपये हातउसने दिले होते. ते पैसे घरमालक परत करीत नव्हता आणि तो रूमही खाली करून मागत होता. त्यांनी पैसे दिल्यानंतर घर खाली करून देण्याचे ठरविले. घरमालक नेहमी नेहमी कोणत्याही कारणावरून शबनम, तिचा भाऊ अमित आणि आईशी भांडण करीत होता.

नागपंचमीच्या दिवशी घरमालकाने शबनमच्या घरातील वीज बंद केली. त्यामुळे त्यांनी रात्र अंधारात काढली. शबनमला अभ्यास करायचा असल्यामुळे तिने घरमालकाला वीज बंद करू नका, अशी विनंती केली. मात्र तो सायंकाळी घरातील वीज बंद करणे, शिवीगाळ करणे, तसेच पाणी भरू न देणे असा त्रास देत होता. घरमालकाच्या जाचाला कंटाळून शबनमने २७ जुलैला दुपारी तीन वाजता गळफास घेतला.

प्रकार लक्षात येताच अमितने फासावरून सोडवून मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, तिचा शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. याप्रकरणी अजनीतील तपास पोलिस उपनिरीक्षक घरमालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात असून, शबनमच्या आत्महत्येमागे वेगळेच कारण असल्याचे सांगत आहेत.

Web Title: nagpur news suicide

टॅग्स