विदर्भात स्वाइन फ्लूचे ५२ मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र या वर्षी दिसत होते. परंतु, स्वाइन फ्लूचा विषाणू उकाड्यातही तग धरून राहिला. स्वाइन फ्लू बाधितांचे मृत्युसत्र प्रचंड वेगाने सुरू झाले. पुण्यानंतर विदर्भात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. १ जानेवारी ते ३१ मे पाच या महिन्यांच्या कालावधीत पुण्यात ८८ मृत्यू झाले असून, त्यापाठोपाठ विदर्भात स्वाइन फ्लूने ५२ मृत्यू झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. यानंतरही उपचार यंत्रणेला मात्र जाग आली नाही. 

विदर्भात गेल्या सहा वर्षांपासून स्वाइन फ्लूची दहशत आहे. दरवर्षी स्वाइन फ्लू डोके वर काढते. या वर्षी पुण्यात स्वाइन फ्लूने ८८ मृत्यू झाले. यानंतर विदर्भात ५२ मृत्यू झाले. अकोला विभागात २२ तर नागपूर विभागात ३० मृत्यूंची नोंद आरोग्य विभागात आहे. याशिवाय नाशिक विभागात स्वाइन फ्लूने ३६ मृत्यू झाले आहेत. यानंतर औरंगाबाद विभागात ३१ जण स्वाइन फ्लूने दगावले. मुंबईत सहा तर कोल्हापूर विभागात ९ मृत्यू झाले. ठाणे आणि लातूर विभागात प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत. नागपूर आणि अकोला विभागात मृत्यूचा आकडा फुगत असल्यामुळेच मेडिकलमध्ये ‘स्वाइन फ्लू वॉर्ड’ तयार झाला. परंतु अद्याप हा वॉर्ड सुरू करण्यात आला नाही. तर, स्वाइन फ्लूच्या निदानासाठी २८ लाख रुपयाचे ‘पीसीआर’ शासनाकडून उपलब्ध करून देण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी अडीच वर्षांपूर्वी केली होती. अद्याप हे पीसीआर मेडिकलमध्ये पोहोचले नाही. 

दरवर्षी स्वाइन फ्लू, हिवताप, डेंगी, गॅस्ट्रो या संसर्गजन्य आजारांवरील नियंत्रणासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा प्रस्ताव २००९ मध्ये डीपीसीकडे सादर केला. तत्कालीन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या काळात हा प्रस्ताव साडेसहा कोटींचा स्वतंत्र वॉर्डाचा प्रस्ताव होता. परंतु, पुढे निधीमध्ये कपात करून १ कोटी ९० लाख रुपये दिले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हाती मेडिकलची सूत्रे आल्यानंतर तळमजल्याचा ‘स्वाइन फ्लू’ वॉर्ड तयार केला. परंतु अद्याप येथे रुग्ण ठेवण्याची सोय केली नाही.

महापालिकेची रुग्णालये नाहीत सक्षम 
विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर महानगरपालिकांची जबाबदारी शहरातील साथ आजारांवर नियंत्रणाची आहे. परंतु, या महापालिकांच्या रुग्णालयात ‘स्वाइन फ्लू’ असो की, डेंगी, मलेरिया, या साथ आजारांवर नियंत्रणासाठी उपचाराची यंत्रणा सक्षम नसल्याची माहिती पुढे आली. प्रतिबंधासाठी जनजागरण करण्याशिवाय या महापालिका काहीच करीत नसल्याचे दिसून आले.

Web Title: nagpur news swine flu