महिलेच्या मृत्यूने स्वाइन फ्लू बळींचा आकडा ४४ वर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नागपूर - पावसाच्या वातावरणामुळे हवेत गारवा आला आणि शहराभोवती स्वाइन फ्लूचे संकट पुन्हा गहिरे झाले आहे. जानेवारीपासून चालू वर्षात या आजाराने आतापर्यंत नागपूर विभागात ४४ जणांचे प्राण घेतले. त्यात पुन्हा एका महिलेच्या मृत्यूची भर पडली. मानापूर येथील ३६ वर्षीय महिला स्वाइन फ्लूची बळी ठरली. ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मृतांची संख्या ३९ झाली आहे. पंचेचाळिशीतील ही महिला शहरातील जम्बुद्वीपनगरातील आहे. विशेष असे की, सर्वाधिक मृत्यू हे नागपूर शहर आणि ग्रामीण भागात नोंदविले गेलेत. एक जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूने दगावलेल्यांमध्ये नागपूर जिल्हा विभागात आघाडीवर आहे.

नागपूर - पावसाच्या वातावरणामुळे हवेत गारवा आला आणि शहराभोवती स्वाइन फ्लूचे संकट पुन्हा गहिरे झाले आहे. जानेवारीपासून चालू वर्षात या आजाराने आतापर्यंत नागपूर विभागात ४४ जणांचे प्राण घेतले. त्यात पुन्हा एका महिलेच्या मृत्यूची भर पडली. मानापूर येथील ३६ वर्षीय महिला स्वाइन फ्लूची बळी ठरली. ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मृतांची संख्या ३९ झाली आहे. पंचेचाळिशीतील ही महिला शहरातील जम्बुद्वीपनगरातील आहे. विशेष असे की, सर्वाधिक मृत्यू हे नागपूर शहर आणि ग्रामीण भागात नोंदविले गेलेत. एक जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूने दगावलेल्यांमध्ये नागपूर जिल्हा विभागात आघाडीवर आहे. त्यापैकी १२ रुग्ण मध्य प्रदेशातून नागपुरात रेफर करण्यात आले होते. विभागात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने आतापर्यंत १७० जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती. यातील ४४ जणांनी जीव गमावला आहे. आतापर्यंत सुमारे आठशेवर व्यक्तींच्या घशातील द्रवाच्या नमुन्यातील चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

अकोला विभागातही २६ मृत्यू 
स्वाइन फ्लूचा प्रकोप पश्‍चिम विदर्भातही आहे. अकोला विभागातही स्वाइन फ्लूने २४ जण दगावल्याची नोंद आहे. मात्र, उन्हाळ्यात अकोला विभागात दिसणारा स्वाइन फ्लू सध्यातरी आटोक्‍यात आहे, असे सांगण्यात आले.

Web Title: nagpur news swine flu