स्वाइन फ्लूने  दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नागपूर - बदलत्या वातावरणातही  स्वाइन फ्लूचा प्रकोप वाढला आहे.  अवघ्या अठरा तासांत दोघे दगावल्या. कोराडी मार्गावरील अष्टविनायकनगरातील पंचेचाळिशीतील युवकांचा तसेच पूर्व नागपुरातील मिनिमातानगरातील १९ वर्षांच्या युवतीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. 

गेल्या चार दिवसांपासून सातत्याने मृत्यू होत आहे. या आठवड्यात सहा जणांचा बळी स्वाइन फ्लूने घेतला आहे. दहा ते बारा जण स्वाइन फ्लूची बाधा झाल्यामुळे विविध रुग्णालयांत भरती आहेत.  

चार दिवसांपूर्वी बुटीबोरीतील व्यंकटेश सिटी येथील ५९ वर्षीय तसेच सूर्यनगरातील ४६ वर्षीय महिला दगावली होती. यानंतर शहरातील अष्टविनायकनगर आणि मिनिमातानगरात दोघे दगावले. आठ महिन्यांत स्वाइन फ्लूच्या बाधेने आतापर्यंत दगावलेल्यांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत २०८ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.

उपराजधानीत २५ मृत्यू
नागपूर विभागात आतापर्यंत २०८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यातील पन्नास टक्‍क्‍यांपेक्षाजास्त स्वाइन फ्लू बाधित शहरातील आहेत. तर एकूण ४८ मृत्यूंपैकी ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मृत्यू हे शहरातील आहेत. शहरातील विविध वस्त्यांमधील २५ जण स्वाइन फ्लूने दगावले आहेत. पहिल्या क्रमांकावर पुणे, दुसऱ्या क्रमांकावर नाशिक  विभाग आहे.

Web Title: nagpur news swine flu