शिक्षकांच्या बदल्या होणार मंगळवारपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

नागपूर - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांचा विषय गेल्या वर्षी चांगलाच चर्चेत आला होता. आता शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार असून, तसे आदेश शासनाकडून शिक्षण विभागास दिले आहेत.

शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासनाने धोरण निश्‍चित केले. या धोरणानुसार संगणकीय पद्धतीने या वर्षीची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांचे शाळानिहाय मॅपिंग होणे आवश्‍यक आहे. सध्या जिल्हा परिषद शाळांची संचमान्यता अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. शालेय शिक्षण विभागाने शाळांना सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने संचमान्यता पूर्ण करण्यासाठी शाळेची व विद्यार्थ्यांची माहिती शाळा व केंद्रप्रमुख लॉगीनमधून ‘फॉरवर्ड’ करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मंगळवारपासून जिल्हाअंतर्गत बदलीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया मुदतीत व नियोजनबद्ध होणे गरजेचे आहे. प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच समायोजनाची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत १५ जानेवारीपूर्वी करण्याची दक्षता घ्यावी, असे शासनाचे पत्र जिल्हा परिषदेकडे  आले आहे.

Web Title: nagpur news teacher transfer issue