अंगाची लाहीलाही, सिग्नल तोडीला बळ देई

अनिल कांबळे
शुक्रवार, 25 मे 2018

नागपूर - उन्हाचा पारा सध्या ४६ अंशांपर्यंत पोचला आहे. अंग भाजून काढणाऱ्या  अशा तप्त उन्हात सिग्नल्सवर एक ते दीड मिनिट थांबणे वाहनचालकांसाठी अवघड होत आहे. अंगाची लाहीलाही होत असल्यामुळे अनेक वाहन चालक काउंटडाउन टायमरची वाट न पाहता सर्रास सिग्नल तोडत असल्याचे समोर आले आहे. उन्हाळा लक्षात घेता किमान दुपारी बारा ते चारपर्यंत सिग्नल बंद ठेवावा अशी मागणी होत आहे.  

शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिव्यांवर महापालिकेने बहुसंख्य चौकांत काउंटडाउन टायमर बसविले आहे. सिग्नलची वेळ ७०-९० सेकंदांची असेल तर,  वाहनचालकांना वाहन बंद करता येईल. त्यातून प्रदूषण कमी होईल आणि इंधनाचीही  बचत होईल, असा दुहेरी उद्देश आहे. मात्र, ऊन सहन होत नसल्यामुळे वाहनचालक वाहतूक नियमांची पायमल्ली करीत आहेत. 

ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. केवळ कडक ऊन आहे म्हणून अशा प्रकारचे वागणे जिवावर बेतू शकते. नियम न पाळणाऱ्यांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे लक्ष ठेवलेले असून  ई-चालान पाठविण्यास सुरुवात केली आहे.
- डॉ. के. वेंकटेशम्‌, पोलिस आयुक्‍त.

दृष्टिक्षेपात
 ट्रॅफिक सिग्नल्स - १४८
 बंद सिग्नल्स - ४०
 एकूण चौक - सुमारे २३० 
 टायमर असलेले चौक - ४० 

Web Title: nagpur news temperature @ 46