वाहतूक पोलिसाला युवकाची मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर - दुचाकीस्वार युवकांना थांबवून कागदपत्रांची मागणी करणाऱ्या वाहतूक शाखेच्या एका पोलिस शिपायाला युवकाने कानशिलात लगावली. नागपुरातील गजबजलेल्या रिझर्व्ह बॅंक चौकात ही घटना घडली. संदीप इंगोले असे मारहाण झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. तर समय आणि वलय मारावार या युवकांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. 

नागपूर - दुचाकीस्वार युवकांना थांबवून कागदपत्रांची मागणी करणाऱ्या वाहतूक शाखेच्या एका पोलिस शिपायाला युवकाने कानशिलात लगावली. नागपुरातील गजबजलेल्या रिझर्व्ह बॅंक चौकात ही घटना घडली. संदीप इंगोले असे मारहाण झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. तर समय आणि वलय मारावार या युवकांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. 

गेल्या तीन दिवसांत पोलिसांना कानशिलात लगावल्याची ही तिसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंजे चौकात एका मद्यधुंद तरुणीने वाहतूक पोलिस शिपायाच्या कानशिलात लावली होती तर व्हीएनआयटी कॉलेजच्या गेटजवळ बजाजनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई भूषण झरकर यालाही नागरिकांनी जबर मारहाण केली होती. नागपुरात हेल्मेट सक्तीअंतर्गत कारवाईला वेग आला असतानाच चौकाचौकात हेल्मेट न घातलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई होत आहे. काही दुचाकीचालकांचा फोटो काढून ई-चालान पाठविण्यात येत आहे. 

रिझर्व्ह बॅंक चौकात अशीच कारवाई सुरू होती. समय आणि वलय गणेश मारावार (जीवनछाया सोसायटी, रामदासपेठ) यांना अडवण्यासाठी महिला कर्मचारी पुढे सरसावली. मात्र, या दोघांनी शिवीगाळ केली. ही माहिती महिला शिपायाने सहकारी शिपाई संदीप यांना दिली. यावरून समयला हटकले असता त्याने दुचाकी इंगोले यांच्या अंगावर घातली. यात इंगोले जखमी झाले. एवढ्यावर या तरुणाची अरेरावी थांबली नाही तर त्याने नंतर वाहतूक शिपायाला शिवीगाळ केली, त्याचा गळा आवळला आणि सर्वांच्या देखत थोबाडीत लगावली. ही संपूर्ण घटना काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली. घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. 

व्हिडिओ झाला व्हायरल 
एका युवकाने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावून शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ काही वेळातच शहरभर पोहोचला. व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून तो सर्वाधिक वेळा फॉरवर्ड करण्यात आला. मात्र, या व्हिडिओमुळे सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊन पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा आहे. 

Web Title: nagpur news traffic police

टॅग्स