वाहतूक पोलिसांना मिळाले ‘मास्क’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नागपूर - शहरातील चौकाचौकात उभे राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्याला आज अचानक ‘मास्क’ दिसून आले. ‘वाहतूक पोलिस श्‍वसन आजाराच्या विळख्यात’ असे वृत्त ‘सकाळ’ने ठळकपणे प्रकाशित केले होते. या वृत्ताची पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी गांभीर्याने दखल घेत वाहतूक शाखेत काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास मास्कचे वितरण केले. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. 

शहर वाहतूक पोलिस दलातील अनेक कर्मचारी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी चौकाचौकात सतत उभे असतात. तसेच गस्त घालत वाहतूक पोलिस फिरत असतात. वाढती वाहनांची संख्या आणि वाहनातून निघणारा धूर तसेच धुलीकणांमुळे वाहतूक पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम पडत होता. वाहतूक शाखेतील जवळपास ८० टक्‍के पोलिस कर्मचारी श्‍वसन आजाराच्या विळख्यात असल्याची गंभीर बाब समोर आली होती. मात्र, अनेकांना याबाबत सजगता किंवा माहिती नसल्याने खोकला, दमा आदिचा त्रास पोलिस कर्मचारी सहन करीत कर्तव्य बजावत होते. ही बाब लक्षात घेऊन ‘सकाळ’ने  त्यावर‘वाहतूक पोलिस श्‍वसन आजाराच्या विळख्यात’ असे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची सोमवारी शहर पोलिस दलात चर्चा होती. पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी दखल घेतली. त्यामुळे आज शहरातील चौकाचौकातील पोलिस मास्क घालून कर्तव्य बजावताना दिसले. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणारे लेख प्रकाशित केल्यामुळे अनेक पोलिसांनी ‘सकाळ’ला शुभेच्छा दिल्या. 

पोलिस कर्मचारी आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. त्यांच्या आरोग्याची आम्हाला काळजी आहे. त्यासाठी वेळोवेळी आरोग्य शिबिराचे आयोजनही केले जाते. कर्तव्य बजावताना येणाऱ्या समस्यांवर मात करून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आमचा पोलिस कर्मचारी सज्ज आहे.
- डॉ. के. वेंकटेशम्‌.

Web Title: nagpur news traffic police got mask