गाडी धावली ‘बिफोर टाइम’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नागपूर - भाजप कार्यकर्त्यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी गुरुवारी अजनी स्थानकावरून विशेष ट्रेन सोडण्यात आली. पण, कार्यकर्त्यांना न घेताच ती बिफोर टाइम रवाना झाली. स्थापनादिनाच्या सोहळ्यात सहभागी होता येणार नसल्याची हुरहूर कार्यकर्त्यांना लागली. रेल्वे प्रशासनाने अडचणीतून मार्ग काढला. पाठीमागून सुटणाऱ्या विशेष रेल्वेत कार्यकर्त्यांची व्यवस्था  केली. पण, त्यासाठी कार्यकर्त्यांना अजनी रेल्वेस्थानकावर ६ तास ठाण मांडून बसावे लागले.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (ता. ६) मुंबईत राज्यव्यापी जंगी सोहळा होऊ घातला आहे. त्यासाठी बूथस्तरावरील कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या सुविधेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. पक्षाने आयआरसीटीसीमार्फत संपूर्ण शुल्कासहित गाड्यांचे बुकिंग केले.

आयआरसीटीसीकडूनच पक्षाला १०.३० वाजता गाडी सोडण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले. कार्यकर्ते वेळेत  पोहोचावेत म्हणून पक्षाने ९.३० ची वेळ दिली. काही उत्साही कार्यकर्ते सकाळपासून अजनी स्थानकावर ठाण मांडून होते. सव्वाआठच्या ठोक्‍याला केवळ ३२ कार्यकर्त्यांना घेऊन विशेष ट्रेन रवाना झाली. यानंतर पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना विशेष ट्रेन पूर्वीच निघून गेल्याचे कळाले. त्यांनी नेत्यांकडे विचारपूस सुरू केली.

पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता विसंवादाची बाब पुढे आली. 
सुटलेल्या रेल्वेला बोलावणे अशक्‍य होते. पण, दुपारी वर्ध्याहून सुटणारी गाडी अजनीतूनच रिकामे डबे घेऊन जाणार होती. या गाडीत नागपूरच्या कार्यकर्त्यांची व्यवस्था  करायची आणि पूर्वीच सुटलेली गाडी वर्ध्यातून कार्यकर्ते घेऊन जाईल, असा तोडगा काढण्यात आला. नवी गाडी ११.३० वाजता सोडण्याचे ठरविण्यात आले. पण, डब्यांच्या स्वच्छतेसाठी बराचवेळ लागला. एकूण ६ तासांच्या ‘बिग ड्राॅमा’नंतर भाजप कार्यकर्त्यांना घेऊन विशेष ट्रेन दुपारी ३ वाजता रवाना झाली.

Web Title: nagpur news Train BJP activists go to mumbai for BJP Party Anniversary