भीषण अपघातात दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नागपूर - मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालविताना नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या अपघातात चालकासह दोघे जागीच ठार झाले तर दोन युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत सावनेर महामार्गावर झाला. अमर सिंग (वय ३०, रा. लखनौ, उत्तर प्रदेश) आणि मोहम्मद इद्रीस (बंगळुरू) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. राहुल अशोक मेहरा (वय ४०, अंधेरी वेस्ट, मुंबई) आणि हार्दिक पटेल (गुजरात) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अमर सिंग, मोहम्मद इद्रीस, राहुल मेहरा आणि हार्दिक पटेल या चौघांचा पूर्वी स्वतंत्र टूर्स ॲण्ड ट्रॅव्हर्ल्सचा व्यवसाय होता. व्यवसायाच्या माध्यमातून चौघांचीही ओळख झाली. त्यांनी नागपुरात टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केले. रामदासपेठेत मोठे कार्यालय असून येथून ते व्यवसाय करीत होते. मानकापुरात भाड्याने राहणाऱ्या अमर सिंगच्या घरी दारू आणि मटण पार्टी ठेवली. रविवारी मध्यरात्री एक वाजतापर्यंत सर्वांनी दारू ढोसली आणि पार्टी साजरी केली. त्यानंतर पान खाण्यासाठी कोराडीकडे जाणाऱ्या रोडवरील अशोका वाटिका रेस्टॉरेंटकडे निघाले. अमरने यथेच्छ दारू ढोसली होती. त्याला व्यवस्थित कारही चालविता येत नव्हती. रस्त्यातच अमरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली.  हा अपघात एवढा भयानक होता की कार जवळपास दहा फुटांपर्यंत वर उडाली आणि उलटली. या अपघातात अमर आणि मो. इद्रीस या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हार्दिक पटेल आणि राहुल मेहरा गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक श्रीमती तराळे स्टाफसह घटनास्थळावर पोहोचल्या. त्यांनी जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले. 

हार्दिक पटेलचा हट्ट नडला...
गुजराच्या हार्दिक पटेलने पार्टी झाल्यानंतर पान खाण्याचा हट्ट केला. मात्र, अमर सिंगने त्याला दारूच्या नशेत असल्याचे सांगून विरोध केला. हार्दिकच्या हट्‌टापोटी चौघांनीही मद्यधुंद अवस्थेत पान खाण्यासाठी पानठेल्यावर जाण्याचा निर्णय घेतला. रस्त्यातच कार दुभाजकावर आदळल्याने हार्दिकचा हट्ट दोघांच्या जिवावर बेतला.

Web Title: nagpur news Two killed in accident