...अन्‌ डोक्‍यावर बंदूक ताणून "तो' चढला झाशीच्या पुतळ्यावर 

...अन्‌ डोक्‍यावर बंदूक ताणून "तो' चढला झाशीच्या पुतळ्यावर 

नागपूर - सायंकाळी पाच वाजताची वेळ... झाशी राणी चौकात नेहमीप्रमाणे गर्दी... पोलिस बूथवर शिपाई वाहतूक नियंत्रित करीत होते... दरम्यान, 25 ते 28 वर्ष वयोगटातील युवक चौकात आला... त्याच्या हातात मळकट अशी पिशवी होती... काही क्षणातच तो झाशी राणी पुतळ्याच्या ओट्यावर चढला... शेजारील दुकानदारांनी त्या युवकाकडे दुर्लक्ष केले... कुणालाही काही कळण्याच्या आत अचानक त्याने पाठीमागे लपविलेली पिस्तूल काढली... स्वतःच्याच डोक्‍याला पिस्तूल लावून गोळी घालून आत्महत्या करण्याची धमकी युवकाने मोठ्याने आवाज काढून दिली... पिस्तूल हातात असल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती... 

गोळी लागण्याच्या भीतीने अनेकांनी पळापळ केली... मात्र, वाहतूक पोलिसांच्या लक्षात प्रकार आला... दोन पोलिस कर्मचारी त्याची समजूत घालत त्याला बोलण्यात गुतवून ठेवले... तर एक पोलिस कर्मचारी लपून ओट्यावर चढला...युवकाचा हात घट्ट पकडून त्याच्या हातून पिस्तूल हिसकावून घेतली. त्यानंतर "त्या' युवकाला ताब्यात घेऊन खाली उतरवले... त्याच्याजवळील पिस्तूल ताब्यात घेतली... मात्र ती छर्रे उडविणारी एअर गन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जवळपास अर्धा तास चाललेल्या या धिंगाण्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला... एखाद्या चित्रपटाला कथानक शोभेल अशी घटना आज सोमवारी झाशी राणी चौकात घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयकुमार लालसिंह पटेल (वय 27, रा. ईश्‍वरपूर, ता. शिवणी-मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. तो बेरोजगार असून कामाच्या शोधात आज नागपुरात आला होता. त्याला दोन भाऊ असून त्याच्याकडे थोडीफार शेती आहे. शेती पिकत नसल्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे तो सांगतो. त्यासोबत घनसौर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाने मारहाण करून धमकी दिल्यामुळे त्रस्त असल्याचेही आरोपी संजय याने सांगितले. शेतात पक्षी किंवा प्राण्यांना भीती दाखविण्यासाठी वापरण्यात येणारी एअरगन त्याने आणली होती. झाशी राणी पुतळ्यावर चढून त्याने वीरूगिरी केली. मात्र, वाहतूक पोलिस शिपाई विपूर सुरवाडे यांनी हिम्मत दाखवून त्याच्या हातून एअरगन हिसकावून घेतली. त्याला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. 

जिगरबाज वाहतूक पोलिस 
वाहतूक शाखा चेंबर दोनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई विपूल सुरवाडे यांना युवक पिस्तूल घेऊन दिसला. त्यांनी जिवाची पर्वा न करता पुतळ्याच्या ओट्यावर चढला. निःशस्त्र असलेल्या विपूल यांनी त्या युवकाशी दोन हात करीत पिस्तुलासह ताब्यात घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com