बेरोजगार तरुणांची "हॅशटॅग' मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नागपूर -  गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भरती बंद असूनही शासनाने शिक्षणसेवक भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे स्वप्न दाखवून परीक्षा घेतली. मात्र, या परीक्षेनंतर अद्याप भरतीसाठीचे पोर्टल सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया त्वरित सुरू करून 24 हजार पदे भरावीत, या मागणीसाठी राज्यभरातील डीटीएड, बीएड आणि एमएड पदवीधारक बेरोजगार तरुणांनी "ट्विटर' माध्यमातून आपली व्यथा मांडत "हॅशटॅग' मोहीम सुरू केली आहे. 

शिक्षणसेवक भरती प्रक्रिया बंद असल्याने डीटीएड, बीएड आणि एमएड केलेले हजारो तरुण बेरोजगार आहेत. आर्थिक संकटांचा सामना करून शिक्षण पूर्ण केल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुणांमध्ये नैराश्‍य आले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात अध्यापक महाविद्यालयांची दुकानदारी सुरू झाली. त्या तुलनेत शिक्षकांच्या जागा भरल्या जात नाहीत. आता तर शिक्षकदेखील अतिरिक्त ठरवले जात आहेत. यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात चांगल्या शिक्षकांची गरज आहे. तेथे जागाही रिक्त आहेत. तरीही शिक्षक भरती केली जात नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून शिक्षक पात्रतेसाठी "टीईटी' घेतली जात आहे. परंतु, ती केवळ पात्रता परीक्षाच आहे. आम्ही केवळ परीक्षाच देत राहायचे का? असा सवाल आता तरुणांकडून करण्यात येत आहे. या परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेतच हजार ते बाराशे रुपये खर्च येतो. यामुळे हताश झालेल्या बेरोजगार तरुणांनी "ट्‌विटर'वर "हॅशटॅग' मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी या मोहिमेची दखल घेऊन 24 हजार शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

परीक्षेनंतरही पदभरती नाही 
12 ते 21 डिसेंबर 2017 दरम्यान शिक्षणसेवक भरती परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा होऊन पाच महिने उलटले आहेत. तरीदेखील पुढील प्रक्रिया सुरू झाली नाही. राज्यभरातून एक लाख 75 हजार तरुणांनी परीक्षा दिली आहे. शिक्षणमंत्र्यांनी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून माहिती देत गुणवत्तेनुसार भरती होईल, असे जाहीर केले होते. हे पोर्टलही बंद आहे. त्यामुळे भावी शिक्षकांनी हे आंदोलन उभारले आहे.

Web Title: nagpur news Unemployed youth hashtag campaign