नागपूर विद्यापीठात शिक्षणशुल्क घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये निर्धारित शैक्षणिक शुल्काऐवजी वाढीव शुल्क घेतले जात असल्याचा आरोप सुनील मिश्रा यांनी केला. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये निर्धारित शैक्षणिक शुल्काऐवजी वाढीव शुल्क घेतले जात असल्याचा आरोप सुनील मिश्रा यांनी केला. 

यासंदर्भात मिश्रा यांनी गुन्हेशाखा (आर्थिक) उपायुक्त यांच्याकडे तक्रार केली. महाविद्यालयांच्या शुक्‍लवाढीमागे कुलगुरू आणि कुलसचिव यांचा वाटा असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. कायद्यानुसार दरवर्षीप्रमाणे विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र १५ जूनला सुरू झाले. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने नियमाप्रमाणे गैरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसाठी अभ्यासक्रमनिहाय शैक्षणिक शुल्क निर्धारित केले नाही. तसेच राज्य सरकारच्या शिक्षण शुल्क प्राधिकरणाच्या १७ जूनच्या परिपत्रकानुसार शिक्षणशुल्क संकेतस्थळावर जाहीर केलेले नाही.  याची जबाबदारी विद्वत शाखेची आहे. मात्र, उपकुलसचिव अनिल हिरेखन यांचे महाविद्यालयांशी संगनमत असून, वाढीव शिक्षण शुल्क स्वीकारण्यास मुभा दिल्याचा आरोप तक्रारीत केला. त्यामुळे वाढीव शुल्क प्रकरणात संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी मिश्रा यांनी केली.

मिश्रा यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. विद्यापीठाने सुरुवातीलाच महाविद्यालयांचे शुल्क निर्धारित केले. मात्र, यानंतरही कुठले महाविद्यालय शुल्क वाढवीत असेल तर त्याला विद्यापीठाची मंजुरी घ्यावी लागते. त्यामुळे असा कुठलाही गैरप्रकार झालेला नाही.
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू

Web Title: nagpur news university education