भाज्या स्वस्त, नागरिकांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नागपूर - उन्हाची तीव्रता वाढताच भाज्यांचे भाव वाढू लागतात. यंदा मात्र आवक वाढलेली असल्याने भाज्यांचे भाव कमीच आहेत. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या प्रारंभीच मोठा दिलासा मिळाला आहे. एरवी एक पाव भाजी घेणारे आज किलोप्रमाणे भाजी खरेदी करीत आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर पालेभाज्यांचा आस्वाद ग्राहकांना चाखायला मिळत आहे. या भाज्यासुद्धा मध्यमवर्गीय आणि गरिबांना परवडणाऱ्या असल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे. 

गेल्या तीन महिन्यांत भाज्यांचे भाव घसरलेले असून, उन्हाळ्याच्या प्रारंभीच भाज्यांचे भाव वाढतील, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या आठवड्यात पावसाने अचानक लावलेल्या हजेरीमुळे भाजी पिकांना संजीवनी मिळाली. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील आणि शहरातील भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. परिणामी बाजारात भाज्यांची आवक वाढलेली आहे. भाज्या स्वस्त असल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. 

विदर्भात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाळी वातावरण असल्याने भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. हिवाळ्यात पालेभाज्या, फुलकोबी, वांगे आदी भाज्यांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते. ती मजा आता उन्हाळ्याच्या तोंडावर मिळू लागल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावरील हास्य द्विगुणित झाले आहे. सर्वच भाज्या स्वस्त झाल्यामुळे मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीत राहणारे पुरेशा प्रमाणात भाज्या खरेदी करीत आहेत. 

मेथी, पालक या पालेभाज्यासुद्धा दोन ते दहा रुपये किलोप्रमाणे बाजारात विक्रीला आहेत. कोथिंबीर 10 ते 12 रुपये किलोप्रमाणे बाजारात विक्रीला आहे, असे राम महाजन यांनी सांगितले. 

घाऊक बाजारातील भाज्यांचे 
प्रतिकिलोचे दर असे 

वांगे : आठ ते दहा रु. 
टोमॅटो : सात ते दहा रु. 
भेंडी : 10 ते 12 रु. 
कारली : 30 ते 40 रु. 
काकडी : 10 ते 12 रु. 
गवार : 30 ते 32 रु. 
पानकोबी : पाच ते दहा रु. 
फूलकोबी - दोन ते पाच रु. 
हिरवी मिरची : 30 ते 35 रु. 
सिमला मिरची : 20 ते 25 रु. 

पालेभाज्या 
पालक : दोन ते पाच रु. 
मेथी : 10 ते 15 रु. 
किलोप्रमाणे विक्रीला आहे. 

Web Title: nagpur news vegetables summer

टॅग्स